संघपुत्त बोधीविहार वाचनालयाचे उद्घाटन.
शुक्रवार, 2 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
नागपुर: - स्थानिक संघपुत्त बोधीविहार भीलगाव (जि. नागपूर) येथे वाचनालयाच्या उद्घाटनाचा आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम साजरा झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघपुत्त बोधीविहार समितीचे कार्याध्यक्ष मा. सिद्धार्थ बागडे होते. प्रमुख अतिथी मा. निर्मलाताई वाघधरे होत्या.वाचनालयाचे उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. शंकर बागडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत ग्रंथपाल मा. मोरेश्वर वासनिक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. या पूजा वंदनेचे नेतृत्व वंदनीय भन्ते पटीसन यांनी केले. त्यानंतर भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सैनिक स्नेहल बोरकर, अशोक टेंभुर्णे, मोरेश्वर वासनिक, बबन मनोहरे, वनिता गाडेकर, हिरामण पाटील, भूपेन्द्र चव्हाण या सर्व सैनिकांचा सत्कार मैत्री बौद्ध महिला मंडळ संघपुत्त बोधीविहार भीलगावच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व फुलाचे रोपटे देऊन केला. यावेळी मोरेश्वर वासनिक, विशाखा लोणारे, सम्यक भालाधरे, रेखा भालेराव यांनी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समयोचित भाषण केले.
त्यानंतर प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी फित कापून संघपुत्त बोधीविहार वाचनालयाचे उद्घाटन केले आणि मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी मा. निर्मलाताई वाघधरे यांनी समयोचित भाषण केले. मा. सिद्धार्थ बागडे यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि संघपुत्त बोधीविहारास साडेबारा हजार रुपये किंमतीच्या ५० खुर्च्या दान दिल्या.
प्रा. डाॅ. शंकर बागडे यांनी वाचनालयासाठी दोन हजार रुपयांचे १५ ग्रंथ आणि रोख एक हजार रुपयांचे दान दिले.संघपुत्त बोधीविहार समितीचे उपाध्यक्ष मा. डी. एम. राऊत यांनी दोन हजार दोनशे रुपयांचे ग्रंथ, सुदाम हुमणे यांनी ५ ग्रंथ आणि रोख पाचशे रुपये दान दिले. संघमित्रा पाटील यांनी पाच हजार, दिगांबर सुखदेवे यांनी पाच हजार, मनोरमा संजीवन गजभिये यांनी पाच हजार रुपयांचे दान दिले.सुषमा भालाधरे यांनी पाचशे, कल्पना मुलमुले यांनी एक हजार, रमाताई भडके यांनी एक हजार, सुनंदा बागडे यांनी एक हजार, धनराज गायकवाड यांनी एक हजार, विजय चव्हाण यांनी दोन हजार, स्नेहल बोरकर यांनी एक हजार पाचशे, प्रभाकर वाळके यांनी एक हजार, रेखा भालेराव यांनी एक हजार, मोरेश्वर वासनिक यांनी दोन हजार, निर्मला वाघधरे यांनी दोन हजार रुपयांचे दान दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघपुत्त बोधीविहार समितीचे उपाध्यक्ष डी. एम. राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन वैजयंती वाळके यांनी केले. याप्रसंगी भीलगाव येथील स्त्री पुरुषांची आणि मुला मुलींची बहुसंख्येनी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघपुत्त बोधीविहार समिती भीलगावच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Response to "संघपुत्त बोधीविहार वाचनालयाचे उद्घाटन."
एक टिप्पणी भेजें