-->
श्री संताजी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

श्री संताजी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.



नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

पालांदूर(चौ) :- स्थानिक श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर (चौ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश बागडे यांनी करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा आढावा स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.रवी पाठेकर यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केलेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र खंडाईत यांनी सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री मुक्तीसाठी केलेली चळवळ व त्यांच्या सामाजिक कार्याच्या आढाव्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केलेत. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित गीते गाऊन आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला प्रा. मनोज मोहतुरे, श्री महेश गुरखे, जया ताई कोडापे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. खुशबू बागळकर, कु.प्रियंका खेडीकर, कु.कोमल हटवार,कु. वैष्णवी सूर्यवंशी, कु. गायत्री भुसारी यांनी फार मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कु. गायत्री कोडापे हिने तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज मोहतुरे यांनी केले.

0 Response to "श्री संताजी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article