पालांदूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती.
रविवार, 4 जनवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव ग्रामपंचायत कार्यालय पालांदूर येथे सरपंच लता मुरलीधर कापसे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. यावेळी उपसरपंच पंकज रामटेके, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत बारई, ईश्वर तलमले , मंगला भुसारी , लिपिक राधेश्याम पाथरे व शिपाई तोमस घावडे उपस्थित होते. सरपंच कापसे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विस्तृत प्रकाश टाकीत आम्हा महिलांच्या शिक्षणाकरिता केलेले कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्यामुळेच आज आम्ही महिला भगिनी शासनाच्या विविध कार्यात सहभागी होऊन समाजाचा सन्मान वाढवला आहे. लोकशाही बळकटी करिता सुद्धा महिला भगिनींचा वाटा मुलाचा आहे. हे सगळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झाले.
0 Response to "पालांदूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती. "
एक टिप्पणी भेजें