-->
​ड्राय डे चा फायदा घेणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यावर लाखांदूर पोलिसांची कारवाई, २६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

​ड्राय डे चा फायदा घेणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यावर लाखांदूर पोलिसांची कारवाई, २६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.


​राजन मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 लाखांदूर :- आज ३० जानेवारी रोजी 'ड्राय डे' निमित्त सर्व अधिकृत मद्यविक्रीची दुकाने बंद असताना, या संधीचा फायदा घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्या एका सराईत विक्रेत्याला लाखांदूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. चप्राड पहाडी जवळील साखर कारखान्यासमोर असलेल्या शेत शिवारात ही कारवाई करण्यात आली.
​आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, लाखांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी गस्त वाढवली होती. याच दरम्यान, गुप्त मिळालेल्या माहितीनुसार, सोनम देवाजी शहारे (वय २४, रा. चप्राड) हा तरुण साखर कारखान्याजवळील शेतात चोरट्या मार्गाने देशी दारूची विक्री करत असल्याचे समजले.
​माहिती मिळताच पोलिसांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली. यावेळी आरोपी सोनम शहारे हा दारू विक्री करताना रंगेहाथ आढळून आला.
​आरोपी सोनम शहारे यांच्या जवळून देशी दारूचे ९० मिलीचे एकूण ६५ नग (पव्वे), ज्याची किंमत साधारण २,६०० रुपये आहे.
​पोलीस अंमलदार ओमकार सपाटे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय खरकाटे आणि मोहीत ढोरे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.
​विशेष म्हणजे, यापूर्वीही सदर आरोपीवर पोलिसांनी दोन वेळा अशाच प्रकारची कारवाई केली होती. 
​सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद टेकाम व त्यांच्या पथकाने केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
​

0 Response to "​ड्राय डे चा फायदा घेणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यावर लाखांदूर पोलिसांची कारवाई, २६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article