सुवर्णा ताठे या इंडियन सोशल स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित.
शुक्रवार, 6 फ़रवरी 2026
Comment
सोनु संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
ठाणे :- सामाजिक कार्यकर्त्या,शिरूर तालुका शिवसेना महिला उपाध्यक्ष सुवर्णा ताठे यांना नुकतेच इंडियन सोशल स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गेली अनेक वर्ष हिरकणी ग्राम संघ अध्यक्ष म्हणून काम करीत असताना,अनेक बचत गटाच्या माध्यमातून राजकीय स्तरावर शिवसेना उप तालुका काम करीत असताना त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे. समाजकार्याच्या अनुषंगाने त्यांना ठाणे येथील इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून इंडियन सोशल पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेते दीपक जोशी यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले, इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा कौतुक सन्मान सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी संपन्न झाला. ही संस्था शिक्षण, कला व संस्कृती , सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे चिप एडिटर डॉ. बी. एन. खरात यांनी केले.संस्थेचा दरवर्षी वर्धापन दिन साजरा होतो. गेले अनेक वर्ष ही संस्था विविध उपक्रम राबवित असते.संस्थेचे सर्व उपक्रम हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, नव्या पिढीला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. श्री. विजय जाधव साहेब, उपनियंत्रक ,नागरी संरक्षण, नवी मुंबई समुह, ठाणे (गृह विभाग विशेष , महाराष्ट्र शासन), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भूपेंद्र संखे, समाजसेवक भारत खांडेकर, समाजसेवक प्रभाकर कांबळे, लक्ष्मीकांत पोपळे, किसन विधाटे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात यांनी केले. तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. स्नेहल येवला यांनी पार पाडली.
0 Response to "सुवर्णा ताठे या इंडियन सोशल स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित."
एक टिप्पणी भेजें