-->
जन माहिती अधिकार्यांचा मुजोरपणा!.

जन माहिती अधिकार्यांचा मुजोरपणा!.


•माहिती अधिकार अधिनियमाची पायमल्ली

• मुदत संपुन ही माहिती देण्यास टाळाटाळ एकात्मिक बाल विकास प्रकल्प लाखांदूर येथील प्रकार.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखांदूर :- शासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी माहितीचा अधिकार (RTI) हा सर्वसामान्यांचे शस्त्र मानले जाते. मात्र लाखांदूर येथील एकात्मिक बाल विकास सेवा
योजना (ICDC) कार्यालयात या काय द्याला केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. विहित कालावधी उलटूनही माहिती न दिल्याने या कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

नेमके प्रकरण काय? 
लाखांदूर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत
होणाऱ्या विविध कामांची आणि 
नियोजनांची माहिती घेण्यासाठी एका 
जागरूक नागरिकांने जोडपञ (अ) नुसार अर्ज सादर केला होता.  
   मुद्दा १) मौजा चिकना अंगणवाडी येथील मृत मदतनीस यांच्या परिवाराला अनुकंपा चे भरतीचे अधिकार आहेत किंवा नाही.याची माहिती देण्यात यावी.
 २) मौजा चिकना येथील मदतनीस भरती प्रक्रिया केव्हा करणार याची माहिती देण्यात यावी.
३) मदतनीस भरती प्रक्रिया शासन परीपञक देण्यात यावे. 
४) मौजा चिकना ग्रामपंचायत ने ग्रामसभा ठराव (कोरा) सादर केल्यास मान्य करणार कि, नाही याची माहिती देण्यात यावी.
५) वरील १ते ४ मुद्दे चि माहिती शासन परीपञक का नुसार प्रमाणित करून देण्यात यावी.
  माहिती अधिकार अधिनियमानुसार, ३० दिवसांच्या आत संबंधित माहिती अर्जदारास देणे बंधनकारक आहे. मात्र , या कार्यालयातील जन माहिती 
अधिकार्यांनी मुदत संपुन ही अघाप कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नाही. 
भोंगळ कारभाराचे दर्शन 
मौजा चिकना येथे अंगणवाडी केंद्र आहे. काही महिन्यांपूर्वी मदतनीस मृत पावली आहे. त्या अनुषंगाने माहिती मागविण्यात आली होती, परंतु, माहिती दिल्यास विभागाचे पितळ उघडे पडेल, या भितिनेच 
श्री, अविनाश एम. बन्सोड विस्तार अधिकारी (सांख्यिकी) टाळाटाळ करीत असल्याचा आरोप अर्जदार, गणेश सोनपिंपळे यांनी केला आहे. 

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. 
लाखांदूर बाल विकास प्रकल्प कार्यालयाची ही कार्यपद्धती संशयास्पद असून , वरिष्ठांनी या कडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. 

विहित मुदतीत माहिती न मिळाल्याने 
आता अर्जदार यांनी प्रथम अपिलिय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल केले आहे. माहिती दडपनार्या दोषी अधिकार् यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 
एकात्मिक बाल विकास प्रकल्प 
भोंगळ कारभार करण्यात अग्रेसर आहे. सन २०१८ मध्ये चिकना अंगणवाडी भरती प्रक्रिया मध्ये 
बनावटीचे दाखले तयार करून अंगणवाडी सेविका भरती केले होते. 
आता तरी शासन परीपञक नुसार
भरती प्रक्रिया होणार काय, अशी चिकना ग्रामवाशी जनतेमध्ये चर्चा
रंगु लागली आहे.

0 Response to "जन माहिती अधिकार्यांचा मुजोरपणा!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article