-->
• खिडकीत अडकलेल्या दोन चिमुकल्यांचा थरारक बचाव.

• खिडकीत अडकलेल्या दोन चिमुकल्यांचा थरारक बचाव.



जेसीबीच्या मदतीने अखेर घरात प्रवेश; मोठा अनर्थ टळला

भंडारा शहरातील डी मार्ट समोरील आयएमए हॉल च्या मागे शनया नगर येथील घटना


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- 9 फेब्रुवारी 2026 ला दुपारी 2 ते 3 वाजे च्या दरम्यान घरात कोणीही नसताना काच व लोखंडी खिडकीच्या मधोमध अडकलेल्या दोन लहान भावंडांचा थरारक प्रसंग परिसरात एकच खळबळ उडवणारा ठरला. डी मार्ट समोरील IMA हॉलच्या मागे शनया नगर येथे प्रा. रवी हलमारे यांच्या घरी घडलेल्या या घटनेत ७ वर्षांची मुलगी रियांशी हलमारे व ४ वर्षांचा मुलगा श्रीयांश हलमारे खिडकीत फसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. रवी हलमारे यांच्या नविन घराचे बाजूलाच बांधकाम सुरु असल्यामूळे आईनी बाळांना आतून दार बंद करायला सांगून निघून गेल्यात , संबंधित दोन्ही मुले घरात खेळत असताना , खिडकीवर चढलेत व बाहेर डोकावण्याच्या प्रयत्नात दोघेही काच व लोखंडी गज असलेल्या खिडकीच्या मधोमध येताच. छोट्या मुलानी पटकन खिडकीची काच बंद करून टाकला . त्यामूळे ते स्वतःहून बाहेर पडू शकत नव्हते. व काचेची खिडकी बाहेरून उघडावी लागत असल्यामूळे त्यांना ते उघडता येत नव्हते . मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले.
दरम्यान, घराला आतून कडी असल्याने दरवाजातून प्रवेश करणे अशक्य झाले. सुरुवातीला स्थानिकांनी खिडकीतूनच मुलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती गंभीर होत चालल्याने मोठा निर्णय घेण्यात आला. अखेर जेसीबी मशीन मागवून खिडकीचा भाग तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
जेसीबीच्या मदतीने घरातील मागच्या बाजूची खिडकी सावधपणे फोडण्यात आली व घरात प्रवेश करण्यात आला. उपस्थित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि यंत्रचालकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुलांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मुलांना प्रचंड धक्का बसला होता.
या घटनेची माहिती मिळताच प्रा. रवी हलमारे व कुटुंबीय तातडीने घरी दाखल झाले. आपल्या मुलांना सुरक्षित पाहून आईवडिलांनी उपस्थितांचे आभार मानले. या घटनेमुळे लहान मुलांना घरात एकटे ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
या प्रसंगामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

0 Response to "• खिडकीत अडकलेल्या दोन चिमुकल्यांचा थरारक बचाव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article