भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत रावनवाडी /खापा येथे नावीन्यपूर्ण उपक्रम...
गुरुवार, 12 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील ग्रामपंचायत रावनवाडी येथे मुख्यमंत्री समुध्द पंचायतराज अभियान व आदिशक्ती अभीयान, माझी वसुंधरा अभीयान ग्रामपंचायत रावनवाडी ६.०अंन्तर्गत दि.११/२/२०२६ ला लोकवर्गणी मधून निर्माण झालेल शालेय व स्पर्धा परीक्षा करीताआँनलाईन अभ्यास करण्यासाठी वायफाय सुविधा असलेल ई वाचनालय चे लोकार्पण सोहळासौ.कविताताई जगदीश ऊईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांच्या हस्ते पार पडला, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत मा.अध्यक्ष सौ कविता जगदीश ऊईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचा सत्कार ,मा.श्री.प्रमोद हुमने सर गटविकास अधिकारी प.सभंडारा यांचा सत्कार करण्यात आला तसेच २०२४ -२०२५मध्ये ई.१०वी व१२वी.मध्ये रावनवाडी व खापा येथील अनुक्रमे कु.स्विटी अर्जुन मालवे,कु.शिवानी शेषराव पंधरे व कु. आरजु दिनेश उईके,जयप्रित काशीराम सिडाम यांना धरती आंबा गुणवंत्त पुरस्कार वने गौरविण्यात आले. श्रीमती.मितु सहादेव वरकडे , निकीता महादेव उईके,बाली निकेश कळपते यांना मुलगी झाल्यामुळे यांना कन्यारत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.शेंद्रीय शेती करणारे रावनवाडी येथील शेतकरी श्री.यादोराव महादेव कुथे,श्री.देवेन्द़ माधो भोंगाडे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.तसेच गावातील शासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी व कर्मचारी श्री.अविनाश भैयाजी उईके ,श्री.भिवा पाडु सिडाम , ईश्वर नारायण उईके यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत रावनवाडी कडून गावातील मुत्यु फंड योजनेतून कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात आहे. ग्रामपंचायत अंपग ५% मधुन अपगांना आवश्यक साहित्य खरेदी साठी आर्थिक सहाय्य देण्यात आले या क्रायक्रम वेळी मा. सौ.कवीताताई जगदीश ऊईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा,मा. श्री.प्रमोद हुमने गटविकास अधिकारी प.स.भंडारा,श्री.विवेक भगत विस्तार अधिकारी पंचायत समिती,श्री.माढरे सर विस्तार अधिकारी आरोग्य प.स भंडारा,सौ.ओमकांता संजय पंधरे सरपंच ,श्री.सुर्यभान भिवा सिडाम उपसरपंच सौ.रंजना मस्के, पुजा प्रत्येकी,श्री शेषराव पंधरे ग्रा.प सदस्य मा.किर्तीलाल भैयाजी उईके तंटामुक्ती अध्यक्ष.श्री. एस .एस लुटे ग्रामपंचायत अधिकारी.श्री.महेश जगनिक सर मुख्याध्यापक जि .प शाळा रावनवाडी व इतर गावातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत रावनवाडी /खापा येथे नावीन्यपूर्ण उपक्रम..."
एक टिप्पणी भेजें