-->
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका : महापौर-उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका : महापौर-उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण.

महापौर पदासाठी ०५ तर उपमहापौर पदासाठी ०५ नामनिर्देशनपत्र दाखल, १० फेब्रुवारीला विशेष सभेत होणार निवड.

विजय चौडेकर 
"साप्ता.जनता की आवाज" 

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवार दि.०६.०२.२०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या निर्धारित वेळेत महापौर पदासाठी एकूण ०५, तर उपमहापौर पदासाठी सुध्दा ०५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली.

महापौर व उपमहापौर पदासाठी तिन्ही प्रमुख गटांनी आपले उमेदवार मैदानात उतरविले आहेत. महापौर पदासाठी दाखल झालेल्या ०५ नामनिर्देशनांमध्ये भारतीय जनता पार्टी-शिवसेना आघाडीकडुन ०२, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीकडुन ०१ तर एम.आय.एम.एम.पक्षाकडुन ०२ अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपा-शिवसेना गटातुन प्रभाग क्र.०२ मधील मुळे कविता संतोष (०२ नामनिर्देशन) , भाराकाँ-वंचित आघाडी गटातुन प्रभाग क्र.१८ मधील माहेजबीन अब्दुल फहीम (०१ नामनिर्देशन) तर एम.आय.एम.पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.१५ मधील अलकेसरी सुमय्या गुल्फाषण सरहान अलकेसरी (०२ नामनिर्देशन) यांनी उमेदवारी अर्ज सादर केले असुन एकाच उमेदवाराकडून एकापेक्षा अधिक नामनिर्देशन दाखल करण्यात आल्याने छाननीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

उपमहापौर पदासाठी सुद्धा एकूण ०५ नामनिर्देशनपत्र दाखल झाली असुन, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी-शिवसेना आघाडीकडुन ०२, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीकडुन ०१ तर एम.आय.एम.एम.पक्षाकडुन ०२ असा पक्षनिहाय तपशील आहे. उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपा-शिवसेना गटातुन प्रभाग क्र.१६ मधील दिपकसिंग काशिनाथसिंग रावत (०२ नामनिर्देशन), भाराकाँ-वंचित आघाडी गटातुन प्रभाग क्र.७ मधील राहूल मधुकर सोनसळे (०१ नामनिर्देशन) तर एम.आय.एम.पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.१३ मधील धोंगडे आश्विनी दशरथ (०२ नामनिर्देशन) यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

*चौकट*
*१० फेब्रुवारीला विशेष सभा, त्याच दिवशी निर्णय*
महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान *पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले* भुषवणार आहेत. या सभेमध्ये महापौर व उपमहापौर निवडीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

0 Response to "नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका : महापौर-उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article