-->
कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे लक्ष.

कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे लक्ष.


नरेंद्र मेश्रम 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

पालांदूर :- शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. ३० जूनपर्यंत प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शासनाकडून माहिती गोळा करण्याचे काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. मात्र, नेहमीप्रमाणे याही कर्जमाफीत नियमित अर्थात चालू पीककर्ज धारकांना न्याय मिळेल काय? हा प्रश्न शेतकरी चर्चित आहेत. थकीत कर्जदारांचा नेहमीच विचार शासन करतो, मात्र नियमित कर्जदाराला वंचित ठेवतो. तेव्हा आम्हालाही न्याय हवा!. अशी आस शेतकऱ्यांना लागली आहे.

महाराष्ट्र सरकारने २०१५ पासून दोनदा कर्जमाफी केली खरी, परंतु पारदर्शकता नसल्याने व नियमांचा जांगडगुत्ता केल्याने बरेच शेतकरी अजूनही २०१५ पूर्वीचे सुद्धा थकीत

मार्चस्तरावर कर्जवसुली प्रभावित होणार !

शासनाच्या धोरणानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून १ एप्रिलपासून पीक कर्जाचे वाटप होते. ते पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी शून्य व्याज दराने भरावे लागते. नियमित कर्जदार कर्जाची भीती डोक्यात ठेऊन दुष्काळ, नापिकी किंवा सुलतानी संकट आले तरी पीककर्ज ३१ मार्चपूर्वी भरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. परंतु, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी डोळ्यासमोर असल्याने व यात नेहमीच थकीत कर्जदारांनाच न्याय मिळत असल्याने मी सुद्धा यावेळी कर्ज भरणार नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मार्च स्तरावर पीककर्ज भरणाऱ्यांची संख्या रोडावणार असे स्पष्ट संकेत चर्चेतून उमटत आहेत.

कर्जदार कर्जाच्या खाईत खितपत आहेत. बरेचदा कर्जदारापेक्षा बँकांनाच कर्जमाफीतून लाभ झाल्याचे बोलले जाते. त्याचे कारणही अभ्यासाअंती पुढे येते की, खरे शेतकरी पीककर्जाच्या योजनेतून वगळले गेले आहेत.

काहींना पुनर्गठनाच्या योजनेमुळे सुद्धा कर्जमाफीचा लाभ झाला नाही. ही वास्तविकता शासनाने व अधिनस्त कमिटीने नजरेसमोर ठेवून पीककर्ज योजना व्यापकपणे राबविणे काळाची गरज ठरत आहे.

0 Response to "कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे लक्ष."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article