-->
त्यागमूर्ती रमाई म्हणजे त्यागाची परिसीमा – प्राचार्य राहूल डोंगरे.

त्यागमूर्ती रमाई म्हणजे त्यागाची परिसीमा – प्राचार्य राहूल डोंगरे.

१४० कोटींच्या आईला शारदा विद्यालयात भावपूर्ण अभिवादन


दिगंबर देशभ्रातार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा/तुमसर :- स्थानिक शारदा विद्यालय, तुमसर येथे १४० कोटी भारतीयांची आई म्हणून गौरविल्या जाणाऱ्या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राहूल डोंगरे होते, तर जेष्ठ शिक्षिका ज्योती बालपांडे, सहा.शिक्षिका सुकांक्षा भुरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य राहूल डोंगरे यांनी रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाचा हृद्यस्पर्शी उलगडा केला. ते म्हणाले, “आई म्हणून रमाईने जे दुःख सहन केले, ते शब्दांत मांडणे अशक्य आहे. स्वतःच्या कुशीत वाढलेली लेकरं एकामागून एक काळाच्या पडद्याआड गेली; मात्र मातृत्वाचे अश्रू तिने छातीत साठवले. कारण तिला माहित होते की, वैयक्तिक दुःखापेक्षा देशाचा संघर्ष मोठा आहे.”

“त्यागमूर्ती रमाई यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे त्यागाची परिसीमा आहे. स्वतःचे आरोग्य, सुख, मातृत्व आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्राच्या भविष्यासाठी अर्पण केला. म्हणूनच रमाई आज केवळ बाबासाहेबांच्या पत्नी न राहता, एका घराची आई न राहता, १४० कोटी भारतीयांची आई ठरते,” असे भावनिक प्रतिपादन त्यांनी केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राष्ट्रीय प्रेमाने झपाटलेले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार म्हणजे त्यागमूर्ती रमाई आहेत. रमाईंचा त्याग, संयम आणि समर्पण हीच बाबासाहेबांच्या महान कार्याची शक्ती होती. त्यांचे आदर्श आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहेत.”

यावेळी प्रमुख अतिथींनीही रमाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. ग्रंथभेट देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन यशस्वी नवखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नेत्रा मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, नितुवर्षा मुकुर्णे, विद्या मस्के, प्रीती भोयर, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी, श्रेया उरकुडे, नेहा बारई, नारायण मोहनकर, दिपक बालपांडे, झनकेश्वरी सोनवणे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

0 Response to "त्यागमूर्ती रमाई म्हणजे त्यागाची परिसीमा – प्राचार्य राहूल डोंगरे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article