-->
अखेर गवराळा स्मशानभूमीची स्वच्छता !.

अखेर गवराळा स्मशानभूमीची स्वच्छता !.

• भद्रावती येथील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचा पुढाकार.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी.

भद्रावती :- शहरातील प्रभाग क्रमांक १४ येथील सर्वधर्मीयांची एकमेव स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासलेली होती. अवतीभोवती अनेक काटेरी झुडपे, सर्वत्र कचरा घाण, रात्रीला असामाजिक तत्वांचा वावर यामुळे अंत्यक्रिया पार पाडण्यासाठी आलेल्या शोकाकुल कुटुंब व आप्तांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत कर्मयोगी बर गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या पुढाकाराने गवराळ्याच्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.

, 2. की ना , ना के का

नी गवराळा वॉर्डातील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचे अध्यक्ष मंगेश हनुमान येरमे व जेष्ठ सदस्यांनी पुढाकार घेत चक्क स्मशानभूमी स्वच्छतेचा वसा घेतला. मात्र मानवी धर्मातून एवढे अवघड कार्य तडीस नेणे कठीण असल्याने स्थानिक नगर परिषद भद्रावतीकडे निवेदने देऊन स्मशानभूमीच्या स्वच्छता व आवश्यक सुविधांबाबत पाठपुरावा

करण्यात आला. मात्र यापूर्वी कोणत्याही सदस्याने याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाही. परिणामतः दिवसेंदिवस या स्मशान भूमीची अवस्था गंभीर होत गेली.

नगर परिषद भद्रावती सार्वत्रिक निवडणूक २०२५ संपताच नगराध्यक्ष म्हणून माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत अनेक गैरसोयीची मैदाने

कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या जेष्ठ सेवानिवृत्त सदस्यांच्या स्वच्छतेचा सहभाग पाहून मी प्रभावित झालो. तद्वतच एक स्वीकृत सदस्य म्हणूनच नव्हे; तर या प्रभागाचा एक जबाबदार नागरिक म्हणून या वॉर्डातील शक्य तेवढ्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास मी यापुढेही कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करेल. राजेश शामराव बदखल, स्वीकृत

सदस्य न. प. भद्रावती

नाल्या, रस्ते स्वच्छतेला प्राथमिकता देण्याचा सपाटा लावला. नगर परिषद भद्रावतीकरिता स्वीकृत नगरसेवक म्हणून राजेश शामराव बदखल यांची तत्परता, सक्रीय सहभाग ही वृत्ती हेरून कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता गणपती वॉर्ड गवराळातर्फे त्यांना स्वच्छतेच्या अभियानात सहभागी होण्यास आवाहन

केले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पासष्ट ते नव्वद च्या वयोगटातील जेष्ठ सेवानिवृत्त सदस्यांच्या स्वच्छता मोहिमेत सदोदीत सक्रीय सहभागी होण्याचा संकल्प घेतला. नवनिर्वाचित सदस्य म्हणून समितीतर्फे त्यांचा सत्कार करतेवेळी स्मशानभूमीची जीर्ण व निर्जीव अवस्था लक्षात आणून देताच त्यांनी बुधवार (दि. ४) पासून कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचे अध्यक्ष मंगेश हनुमान येरमे, जेष्ठ सदस्य अरुण येरकाडे, दिनकर घाटे, संजय शामराव बदखल आदी सदस्यांसह स्वतः उपस्थित राहून स्मशानभूमी स्वच्छतेला मूर्त रूप देण्याची मोहीम सुरू केली. माझ्या कारकीर्दीत पुरेश्या निधीची तरतूद करून, योग्य प्रकाश व्यवस्था, सांडपाणी निचरा, रोड, आप्तांना व अंत्ययात्रवेळी उपस्थिताना बसण्यास बेंचेस ची व्यवस्थेसह या स्मशानभूमीच्या सौंदर्याकरणास आपण प्राधान्य देऊ असे सांगितले.

0 Response to "अखेर गवराळा स्मशानभूमीची स्वच्छता !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article