महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नायगाव कार्यालय येथे अधिकाऱ्यांसह घेतली दलालांची फिरकी - गजानन पाटील चव्हाण.
बुधवार, 4 फ़रवरी 2026
Comment
विजय चौडेकर
"सापताहीक जनता की आवाज"
नांदेड :- दिनांक 02/02/2026 रोजी नायगाव शहर येथील
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा कार्यालय येथे नायगाव शहरासह नायगाव उमरी धर्माबाद मतदार संघातील कामगार मजदूर सह समान्य बांधवांची कामगार कल्याणकारी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे या सर्व दलाल व्यक्तीने सामान्य बांधवांची दोन ते तीन हजार रुपये काम करतो म्हणून घेत आहेत
खऱ्या अर्थाने शासन निर्णय याप्रमाणे पूर्ण फाईल मोफत आहे अर्थात लाभ पूर्ण मोफतच मिळतो
त्यामुळे संबंधित सर्व जनतेला नागरिकांना विनंतीपूर्वक आव्हान आहे की आपल्याकडून आर्थिक लूट होत असलेली ती तात्काळ थांबवावी आणि मोफत लाभ घेण्यात यावा अशी विनंती तथा आव्हान करते गजानन पाटील चव्हाण च्या वतीने करण्यात येत आहे
पण या ठिकाणी अधिकारी आणि दलाल या सर्व लोकांच्या संगनमताने आर्थिक लूटमार चालू आहे
हे सर्व लूट तात्काळ थांबवावे अन्यथा न्यायला जास्त पुराव्या निशी बाबी मिळाल्यास संबंधितावर फौजदारी तथा दंडात्मक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यासाठी गजानन पाटील चव्हाण पुढाकार घेण्यासाठी पूर्ण ताकतीने इशारा देत आहेत
सदर या सर्व रोजगार बांधवांसाठी उपयुक्त अशाप्रकारे लाभ मिळतो
- बांधकाम कामगारांची नोंदणी करणे
- बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ देणे
- बांधकाम कामगारांच्या हक्कांचे रक्षण अर्थात विमा करणे
- बांधकाम कामगारांना मुला मुलींसाठी शिक्षणक, व आर्थिक अनुदान व प्रशिक्षण आणि रोजगाराच्या आर्थिक आणि सामाजिक मान-उंचावण्यासाठी या सर्व उपाययोजना केलेले आहेत
- पण खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांची लूट मार होत आहे ती मोठी शोकांतिका आहे
तसेच महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक शासन निर्णय घेतले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे निर्णय असे आहेत *महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, 2007* या अधिनियमानुसार बांधकाम कामगारांच्या रोजगार आणि सेवाशर्तीचे लाभ घेता येतो
यासह संबंधित लाभधारक यांच्या साक्षीने संबंधित एजंट अधिकारी यासह सर्वांना खडे बोल करत आणि नायगाव शहर उमरी धर्माबाद मतदारसंघातील सर्व जनतेंना विनंतीपूर्वक आव्हान करते वेळेस गजानन शंकरराव पाटील चव्हाण व नागरिक उपस्थित होते,,
0 Response to "महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नायगाव कार्यालय येथे अधिकाऱ्यांसह घेतली दलालांची फिरकी - गजानन पाटील चव्हाण."
एक टिप्पणी भेजें