भंडाऱ्याच्या तरुणाचा लढा यशस्वी.
मंगलवार, 17 फ़रवरी 2026
Comment
• 10 साल बाद मुद्रा संग्रहालय की कोइन [2026]
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज" ्
भंडारा :- रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या मुंबई येथील नाणे संग्रहालयात देशातील जुन्या काळापासून ते आजपर्यंत सर्व प्रकारची नाणी संग्रहित करण्यात आलेली आहेत. हे मुद्रा संग्रहालय लोकांना अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
भंडारा जिल्ह्यातील टेकेपार (डोडमाझरी) या छोट्याश्या गावातून प्रफुल्ल रामटेके नावाचा एक तरुण आपल्या कामाकरिता मुंबई ला स्थायिक झाला. दहा वर्षांपूर्वी त्याला या मुद्रा संग्रहाबद्दल माहिती मिळाली, औत्सुक्या पोटी त्याने मुद्रा संग्रहालयाला भेट दिली. सर्व प्रकारचे पुरातननाणे आणि रिझर्व्ह बँकेने छापलेल्यातथा इंग्रजांच्या काळातील सर्व नोटा मोठ्या दिमाखाने संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांच्या
ज्ञानात भर टाकत होत्या. त्याचप्रमाणे भारतातील महत्वाच्या महापुरुषांच्या स्मरणार्थ त्यांचे फोटो असलेली नाणीसुद्धा संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. १० वर्षापूर्वी हे संग्राहालय न्याहाळतांना प्रफुल यांनी संग्रहालयाची एक चूक अचूक हेरली, त्यांच्या लक्षात आले कि सगळ्या महापुरुषांची नाणी या ठिकाणी आहेत परंतु भारतरत्न डॉ. बाबाहेबांच्या आंबेडकरांच्या स्मरणार्थ रिझर्व बँकेने चलनात आणलेले १ रुपयाचे व १० रुपयाचे त्यांचा फोटो असलेले नाणे संग्रहालयात दिसत नाही, बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेला समता सैनिक फारव्यथित झाला आणि तिथून हा संघर्ष सुरुझाला. संबंधित कर्मचाऱ्यांकडे याची विचारणा केली, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी रिझर्व बँकेच्या मेल वर रीतसर तक्रार नोंदवली, सलग १० वर्षे यासाठी पाठपुरावा केला वेळोवेळी संग्रहालयाला भेटी देत तिथल्या अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला, अधिकारीही प्रोसेस सुरु असल्याची बतावणी करीत राहिले. मागील
वर्षी मी असित बागडे आणि माझी पत्नी मुलगा गुंजन बागडे मुंबई ला गेलो असता प्रफुल मला या संग्रहालयात घेऊन गेले आणि आवर्जून ही बाब माझ्या लक्षात आणून दिली. मि पण आंबेडकरी कार्यकर्ता असल्याने दोघेही सोबत अधिकाऱ्यांकडे जाऊन यासंबंधी विचारणा करू लागलो, आमची ही तळमळ बघून तिथे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले की, आमच्या नवीन बॉस आलेल्या आहेत त्यांना तुम्ही भेटा. आम्ही सबंधिताकडे जाऊन या विषयावर कडक चर्चा केली तसेच आंदोलनाची धमकी सुद्धा दिली. सबंधितांनी याचे गांभीर्य लक्षात घेत आम्ही केलेल्या पाठपुराव्याचे आकलन केले, लगेच कार्यालयीन स्तरावर हे प्रकरण कुठवर आलं आहे याची माहिती घेतली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी सुद्धा केली, हे सगळं आम्ही बघत होतो. मग काही वेळानीत्या हसत मुखाने बोलल्या की आपण निश्चिन्त राहा आपली रास्त मागणी लवकरच पूर्ण होईल आणि बाबासाहेबांचे फोटो असलेली दोन्ही नाणे या संग्रहालयात सन्मानपूर्ण ठेवले जातील. आम्हाला याबाबद माहिती देण्यासाठी प्रफुलचा
नंबर त्यांनी लिहून घेतला. दि. २७ जानेवारी २६ ला भंडाऱ्याचे समता सैनिक दल यांना घेऊन प्रफुल संग्रहालयात गेले असता कार्यकर्त्यांना बघताच स्वतः अधिकाऱ्यांनी प्रफुल जवळ येऊन सांगितले की तुम्ही केलेली रास्त मागणी मान्य झाली आहे आणि बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त जारी केलेले १० रुपयाचे नाणे किती सन्मानाने या ठिकाणी ठेवण्यात आले हे दाखविले. हे बघताच कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला. मन आनंदाने भरून आले. मुद्रा संग्रहालयाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतानां चा क्षण खूप महत्वपूर्ण असल्याचा फोन मला केला, फोटो पाठवले, मी पण धन्य झालो आणि प्रफुल चे खूप अभिनंदन केले.
यापुढे मुंबई च्या मुद्रा संग्रहालयात बाबासाहेबांचे नाणे फारच शोभून दिसणार आहे.
आपसूकच शब्द निघाले'' हे नाणं दिसतंया शोभूणं, बाबासाहेबांच्या फोटून
-असित बागडे
सामाजिक कार्यकर्ता
भंडारा - महाराष्ट्र
0 Response to "भंडाऱ्याच्या तरुणाचा लढा यशस्वी."
एक टिप्पणी भेजें