-->
संविधान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे निवासी शाळा वानाडोंगरी येथे बक्षीस वितरण.

संविधान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे निवासी शाळा वानाडोंगरी येथे बक्षीस वितरण.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 नागपूर :- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, अंतर्गत संविधान अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत संविधान जागर उपक्रम हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुवर यांच्या वतीने तालुक्यात राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत वस्ती, तांडा, गाव, शाळा, महाविद्यालयात या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधान जनजागृती करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा वानाडोंगरी येथे संविधान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला स्पर्धेत एकूण पाच गट होते समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय व संविधान. प्रत्येक गटात पाच विध्यार्थी होते, या स्पर्धेत संविधान गट विजयी झाला स्वातंत्र्य व समता गटाला समान गुण मिळाले. व न्याय गट तिसऱ्या स्थानी राहिला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुवर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधपिका सुजाता दरेकर मॅडम कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून हृदय गोडबोले प्रकल्प अधिकारी समतादूत विभाग बार्टी, सहाय्यक शिक्षिका स्नेहल शंभरकर मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून मंचावर स्थान भूषविले.*
     *कार्यक्रमाचे मार्गदर्शक बार्टी प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, मुख्यधपिका सुजाता दरेकर, शिक्षिका स्नेहल शंभरकर, समतादूत सतीश सोमकुवर यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी व सहभागी विद्यार्थ्यांना बार्टी सन्मान चिन्ह, बार्टी दिनदर्शिका, संविधान उद्देशिका व प्रमाणपत्र देवून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी बार्टी व सामाजीक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्यध्यापिका सुजाता दरेकर, शिक्षिका स्नेहल शंभरकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सोमकुवर व आभार परतेकी मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

0 Response to "संविधान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे निवासी शाळा वानाडोंगरी येथे बक्षीस वितरण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article