प्रतापगड यात्रेत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी तिरंगा धाबा प्रतिष्ठानचा सलग दुसऱ्या दिवशीही सेवाभावी उपक्रम.
मंगलवार, 17 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
अर्जुनी/मोर :- तिरंगा धाबा प्रतिष्ठान, कुभिटोला-बाराभाटी यांच्या वतीने प्रतापगड यात्रेत कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांसाठी सलग दुसऱ्या दिवशी अल्पाहाराचे वितरण करण्यात आले. दि. १६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रेत येणाऱ्या हजारो भाविक भक्तांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तिरंगा धाबा प्रतिष्ठानचे मालक वैभव बनकर यांनी पोलिस दलासाठी नाश्त्याची विशेष व्यवस्था केली. तसेच भाविकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने तिरंगा धाबा तर्फे अॅम्ब्युलन्सचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कुभिटोला-बाराभाटी येथील तिरंगा धाबा प्रतिष्ठान हे नेहमीच आरोग्य, शिक्षण तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असते. या सलग दोन दिवस चाललेल्या सेवाभावी उपक्रमाबद्दल Maharashtra Police (गोंदिया पोलीस पथक) यांनी तिरंगा धाबा प्रतिष्ठानचे विशेष कौतुक केले. दरम्यान, जनहितार्थ सेवा समिती द्वारा आयोजित "एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत, तिरंगा धाबा प्रतिष्ठानच्या सहकार्याने महाशिवरात्री निमित्त प्रतापगड यात्रेच्या बंदोबस्तासाठी कार्यरत पोलिसांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली.
सुकळी फाटा व गोठणगाव फाटा येथे तैनात असलेल्या पोलिस दलाला अल्पाहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी गोंदिया पोलीस टीमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील व उपपोलीस निरीक्षक घनश्याम रोहणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पोलिस बांधवांना नाश्ता वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी जनहितार्थ सेवा समितीचे सदस्य शिशुपाल बेलखोडे, वैभव बनकर, पदमाकर रंगारी, चंद्रमणी तिरपुडे, नरेंद्र बेलखोडे व आकाश चुटे यांनी पुढाकार घेतला. तिरंगा धाबा प्रतिष्ठानच्या टीमनेही उत्साहाने सहभाग नोंदवत पोलिस बांधवांना अल्पाहार वितरण केले. समाजासाठी सातत्याने कार्यरत असलेली जनहितार्थ सेवा समिती ही पूर्णतः निःस्वार्थ व समाजाभिमुख संस्था असून, समितीतील सदस्य दर महिन्याला १०० रुपये जमा करून गरजू व गरीब लोकांच्या मदतीसाठी योगदान देतात. विशेषतः शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांवर अधिक भर दिला जातो. शेतकरी, मजूर व लहान व्यवसायिकांचा समावेश असलेली ही समिती समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करत आहे. या सेवाभावी उपक्रमामुळे समाजात सेवा, सहकार्य व सामाजिक बांधिलकीचे सुंदर चित्र उभे राहिले सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 Response to "प्रतापगड यात्रेत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी तिरंगा धाबा प्रतिष्ठानचा सलग दुसऱ्या दिवशीही सेवाभावी उपक्रम."
एक टिप्पणी भेजें