चक्रधर स्वामींच्या चरणांना पावणार 'स्वामीत्व'चा खातेउतारा!; तीर्थस्थांनाची महसुली दप्तरात नोंद.
रविवार, 22 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
भंडारा/तुमसर :- तब्बल ८०० वर्षाची आध्यात्मिक परंपरा जपणाऱ्या श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या मंदिरांना अखेर शासन मान्यता मिळणार आहे. महसूल विभागाच्या निर्देशानंतर राज्यभरातील जिल्ह्यांतील प्राचीन तीर्थस्थानांची सातबाऱ्यावर अधिकृत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या स्थळांना आता 'स्वामीत्व'चा अधिकृत खातेउतारा मिळणार आहे. १७
राज्य शासनाच्या पुढाकाराने १७जिल्ह्यांतील हजारो मंदिरांची महसुली
नोंद घेण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. सातबाऱ्यावर नोंद झाल्यानंतर ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून विकास साध्य करता येणार आहे. त्यादृष्टीने महसूल मंत्र्यांनी १७ जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.
राज्यातील ८०० वर्षांपूर्वीची प्रमुख तीर्थस्थाने
१) सातारा - ०२ , २) अहिल्यानगर - ४५
३) नाशिक -१२ , ४) जळगाव - ०७
५) छ. संभाजीनगर - ३७ , ६) यवतमाळ - १८
७) बीड - २३ , ८) नांदेड - ०८
९) बुलडाणा - ०९ , १०) अकोला - ०८
११) वाशिम - ०१ , १२) अमरावती - ४८
१३) जालना - २४ , १४) वर्धा - ०१
१५) नागपूर - ०४ , १६) भंडारा - ०३
१७) गोंदिया - ०१
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विकास होणार आहे. त्यादृष्टीने १७ जिल्हाधिकाऱ्यांची महसूलमंत्र्यांनी बैठक घेत आढावा घेतला.
राज्य अधिवेशनापूर्वी नोंदींचे
पूर्ण करावे, असे निर्देश महसूल मंत्र्यांनीज्ञ दिले आहेत. या नोंदी झाल्यानंतर या तीर्थस्थळांना चालना मिळणार आहे.
अनिल बोढारे (नागपूर),
तीर्थस्थान नोंद समन्वयक
0 Response to "चक्रधर स्वामींच्या चरणांना पावणार 'स्वामीत्व'चा खातेउतारा!; तीर्थस्थांनाची महसुली दप्तरात नोंद."
एक टिप्पणी भेजें