राहुल गांधी यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी.
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
• करणी सेनेचा व्हिडिओ पाहून काँग्रेसचा संताप.
"साप्ताहिक जनता की आवाज"
धमकी देनेवाला युवक
दिल्ली :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आलाय. करणी सेनेच्या नेत्यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसच्या २५ खासदारांचाही उल्लेख आहे. काँग्रेसच्या नेत्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आज पुन्हा आणखी एक गोडसे तयार केला जातो आहे, असा हल्लाबोल यावेळी काँग्रेसने केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर ही धमकी देणाऱ्या संबंधित
कार्यकर्त्याला राजस्थान पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. भाजप आणि करणी सेनेच्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या व्हायरल व्हिडिओत त्याने केवळ राहुल गांधी यांनाच नाही तर काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांनाही धमकी दिली आहे. या व्हिडिओनंतर
राजकारणात मोठी खळबळ उडाली. आहे आणि काँग्रेसने आता भाजपला धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेत या व्हिडिओवरून संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सदरील व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाजपचा पदाधिकारी हा राहुल गांधी यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देताना दिसून येतो आहे. हाच व्हिडिओ आता काँग्रेसच्या विविध सोशल मीडियावरून जोरदार शेअर केला जातो आहे आणि भाजप, आरएसएसवर टीका केली जात आहे.
0 Response to "राहुल गांधी यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी."
एक टिप्पणी भेजें