मिलिंद बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी.
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
. रमाई जयंती साजरी
सोन संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
हडपसर (पुणे) :- हडपसर येथील रामटेकडी परिसरात असलेल्या मिलिंद बुद्ध विहारामध्ये दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम रमाई जयंती सामाजिक कार्यकर्ता ग्रुप व ओजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमात रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री-मुक्ती चळवळीतील योगदानावर विचार मंथन करण्यात आले. रमाई आंबेडकर यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचे कार्य दिशादर्शक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास पंचशीला कुंभारकर, अली सय्यद, सुनीता गरुड, रक्षा थोरात, लक्ष्मी ताई वाघमारे, रमा आठवले, श्रीधर जाधव, गायकवाड दादा, यश ठोसर, विश्वजित ठोसर, अनिता ठोसर, अश्विनी ठोसर, प्राजक्ता देडगे, ललिता गायकवाड, बोऱ्हाडे मॅडम, कोमल पायळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून महिलांच्या हक्कांबाबत जागृती, सामाजिक समतेचा संदेश व संविधानिक मूल्यांची जोपासना यावर भर देण्यात आला. उपस्थितांनी रमाई आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
0 Response to "मिलिंद बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी."
एक टिप्पणी भेजें