रस्ता सुरक्षेचा जागर शारदा विद्यालय तुमसरने पेटवला; जिल्हास्तरावर विविध स्पर्धेत दणदणीत विजय.
शनिवार, 7 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/तुमसर :- रस्ता सुरक्षा म्हणजे फक्त नियमांचे पालन नव्हे, तर प्रत्येक जीव वाचविण्याची सामाजिक जबाबदारी— हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम शारदा विद्यालय, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी केले आहे.
३७ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये शारदा विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत तुमसरचे नाव जिल्ह्यात उज्ज्वल केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पलाडी (नवीन RTO इमारत), भंडारा येथे पार पडलेल्या भव्य समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात शारदा विद्यालयाच्या RSP (Road Safety Patrol) पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या शुभहस्ते ‘रस्ता सुरक्षा कक्षा’चे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी, तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कामगिरीला मान्यवरांची दाद:-
रस्ता सुरक्षा, वाहतूक शिस्त, अपघात प्रतिबंध व जनजागृती या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले निबंध, चित्रकला, प्रश्नमंजुषा व एकांकिका प्रभावी, विचारप्रवर्तक आणि समाजभान जागविणारी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
“रस्ता सुरक्षा म्हणजे नियमांची भीती नव्हे, तर जीवन वाचविण्याची जाणीव आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून ठळकपणे समोर आला.
स्पर्धानिहाय शारदा विद्यालयाचे मानकरी:-
🔹 निबंध स्पर्धा
प्रथम – कु. रसिका पवन साखरकर
द्वितीय – कु. गायत्री प्रभाकर मोहतुरे
🔹 चित्रकला स्पर्धा
प्रथम – कृष्णप्रसाद पारधी
द्वितीय – जालिंद्र कुंजेकर
🔹 प्रश्नमंजुषा (खुला गट)
प्रथम – कु. तुरिया रामदास वाघमारे
द्वितीय – मयूर प्रकाश कोकोडे
तृतीय – कु. गुंजन प्रकाश कामथे
🔹 प्रश्नमंजुषा (इ. ९ वी ते १० वी)
प्रथम – कु. शर्वरी विनोद बिसने
द्वितीय – कु. लिझा दामोदर हैडाऊ
तृतीय – कु. माही महेंद्र मेश्राम
🔹 एकांकिका स्पर्धा
प्रथम – शारदा विद्यालयाचे RSP पथक
(यशस्वी नवखरे, विपशी बागडे, निधी जमदाळे, प्रिन्सी मोटघरे, तन्वी कांबळे, काशवी पडोळे, नयना तहेकार, माही रामटेके, क्रिस्टी नेवारे, जान्हवी सरवरे, हिमानी कोल्हे, वैशाली जयस्वाल, राम बोपचे, सागर अतकरी, सक्षम गोंडाने, सक्षम फुले, तन्मय पटले, सौम्य बिसेन, सोहम बोंद्रे, अविनाश वंजारी)
सन्मानाचा क्षण:-
विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा गजभिये, रविंद्र सोनटक्के (प्राथमिक विभाग, जि. प. भंडारा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य राहुल डोंगरे यांचे प्रेरणादायी नेतृत्व:-
शारदा विद्यालय तुमसरचे प्राचार्य राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली RSP पथक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मेहनत, सामाजिक बांधिलकी व टीमवर्कचे उत्तम उदाहरण घडविले.
ज्योती बालपांडे, दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, अशोक खंगार, विद्या मस्के, नितुवर्षा मुकुर्णे, प्रीती भोयर, सारिका आठोडे, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, बेनिता रंगारी, नेहा बारई, अंकलेश तिजारे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
“सडक सुरक्षा – जीवन रक्षा” या घोषवाक्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देत शारदा विद्यालय तुमसरने रस्ता सुरक्षेच्या चळवळीत आदर्श पाऊल उचलले, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
0 Response to "रस्ता सुरक्षेचा जागर शारदा विद्यालय तुमसरने पेटवला; जिल्हास्तरावर विविध स्पर्धेत दणदणीत विजय."
एक टिप्पणी भेजें