-->
परीक्षेच्या भीतीवर संवादाची औषधं!.

परीक्षेच्या भीतीवर संवादाची औषधं!.


• “परीक्षा पे चर्चा” उपक्रमातून शारदा विद्यालय तुमसर येथिल विद्यार्थ्यांना नवी उमेद.

"सप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्तपत्र प्रतिनिधी
 
भंडारा/तुमसर :- परीक्षा म्हणजे ताण, भीती आणि दडपण — ही मानसिकता बदलण्याचे काम “परीक्षा पे चर्चा” या राष्ट्रीय उपक्रमाने केले. शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे या उपक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.

या उपक्रमात शाळा व कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील १३८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शविली. इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दिशा देणारा ठरला.

भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या विविध कोपऱ्यातील — पंजाब, गोवा, गुजरात, छत्तीसगड, आसाम, सिक्किम आदी राज्यांतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, परीक्षेचा ताण कसा कमी करावा, अभ्यासात सातत्य कसे ठेवावे, वेळेचे व्यवस्थापन, जीवनातील मूल्ये आणि ध्येयपूर्तीचा मार्ग यावर प्रभावी मार्गदर्शन केले. “परीक्षा ही आयुष्याची कसोटी नसून, ती स्वतःला ओळखण्याची संधी आहे” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.

कार्यक्रमासाठी प्रोजेक्टर व ध्वनिवर्धक यंत्रणेची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी अत्यंत शांत, शिस्तबद्ध व एकाग्रतेने कार्यक्रम पाहत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हा उपक्रम मुख्याध्यापक श्री. राहूल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी शिक्षक श्रीराम शेंडे, संजय बावनकर, श्रेया उरकुडे, पंचायत समिती तुमसरच्या विषय साधन व्यक्ती मा. उज्ज्वला बावनकर मॅडम, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढला असून, सकारात्मक विचारसरणी व नियोजनबद्ध अभ्यासाची प्रेरणा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

0 Response to "परीक्षेच्या भीतीवर संवादाची औषधं!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article