एकात्मिक बालविकास प्रकल्प वानामतीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची पिपरी येथील अंगणवाडीला भेट .
शनिवार, 14 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील वानामती केंद्रातील एकूण ७० प्रशिक्षणार्थी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन येथील अंगणवाडी क्र.२ च्या अंगणवाडी केंद्राची गुणवत्ता तपासणी व अभ्यास दौऱ्याचे औचित्य साधून अंगणवाडीला नुकतीच भेट दिली . व सुसज्ज अंगणवाडी केंद्रातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली . या भेटी दरम्यान अंगणवाडी केंद्रातील कामकाज , डिजिटल अंगणवाडी, बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण वाटिका परसबाग, पालेभाज्यांचे महत्त्व , मोबाईलचे ऑनलाइन पोषण ट्रेकर , पोषण आहार व पुनर्वसन गावासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेतली. बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी व अंगणवाडीतील बालकांशी मनसोक्त संवाद साधला व विभागाशी संबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात आली. अंगणवाडी केंद्रात राबवीत असलेल्या नाविन्यपूर्ण विविध स्तुत्य उपक्रमाबाबत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. व स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी शहरी बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन मोहुर्ले , ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मेंढे , पर्यवेक्षिका सुधा श्रीकोंडवार , ज्ञानेश्वरी जीभकाटे , अंगणवाडी सेविका सुरेखा लांबट , उषा गाढवे , सरपंच देविदास ठवकर , उपसरपंच संतोष कारेमोरे , माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिक चवरे , ग्रामपंचायत अधिकारी पी.जी. वैद्य , ग्रामपंचायत सदस्या संगीता लांडगे , उज्वला शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अंगणवाडी सेविका सुरेखा लांबट , उषा गाढवे , सुजाता चवरे , कल्पना वैद्य , आरती बदने , सत्यवान लांबट , सचिन लांबट , सम्यक चवरे , कुंदा चवरे ,सोनिया चवरे यांनी सहकार्य केले.
0 Response to "एकात्मिक बालविकास प्रकल्प वानामतीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची पिपरी येथील अंगणवाडीला भेट ."
एक टिप्पणी भेजें