वर्ग दहावीला निरोप आदिवासी शिव विद्यालय मिन्सी.
शनिवार, 14 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय मिन्सी येथे 13 फेब्रुवारी 2026 ला वर्ग 9 कडून वर्ग दहावीला निरोप देण्यात आला. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक गभने सर, विलास बांडेबुचे,सनराईज कॉम्प्युटर पहेला, विद्यालयाचे शिक्षक दिघोरे सर, मंगर सर, पुरामकर सर, कु परशुरामकर ,नखाते कहालकर अतकरी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत कथन केले वर्ग दहावी कडून विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज आणि भोले शंकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच सनराइज कॉम्पुटर चे संस्थापक श्री बांडेबुचे यांचेकडून वर्ग दहावी सराव परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.अध्यक्ष महोदय गभने सर यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात पेपर कसा लिहायचा. पेपरला सामोरे जाताना घाबरू नका, हीमतीने पेपर द्या अभ्यास करून जा अशा प्रकारचे मार्गदर्शन केले शेवटी स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "वर्ग दहावीला निरोप आदिवासी शिव विद्यालय मिन्सी."
एक टिप्पणी भेजें