धम्मगिरी बौद्धविहार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
जीतेंद्र गाडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
बुलढाणा :- बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मलकापूर रोड स्थित धम्मगिरी बुद्ध विहार येथे मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी सदर कार्यक्रमाच्या मा. अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा स्वीकृत नगरसेवक सुनील सपकाळ, मोहन पहऱ्हाड, अरविंद होंडे हे होते, विशेष उपस्तिथी मध्ये भीमराव जाधव, आर के इंगळे, विद्यासागर मिसाळकर, दिलीप वाघमारे तर उपस्तिथी मध्ये एस.यु. बावस्कर, पी.आर. इंगळे, मंगल मिसाळ, भैय्यासाहेब पाटील, बाबासाहेब
जाधव, अशोक दाभाडे, विजय राऊत, संजय कस्तुरे, विजय वाकोडे, सुनील धुरंधर, सुभाष साबळे, प्रेम इंगळे, सुरेश सरकटे, मिलिंद वानखडे, प्रिन्स हिवाळे, दादाराव पगारे, झिने साहेब, अर्चना जाधव, सुजाता हिवाळे इत्यादी महिला व पुरुष उपस्थित होते. मंगल प्रसंगी शिवरायांना अभिवादन करून प्रमुख
मंडळींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विषद केले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक दाभाडे यांनी केले तर प्रस्ताविक मिलिंद वानखडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रेम इंगळे यांनी केले. सरनत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "धम्मगिरी बौद्धविहार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी."
एक टिप्पणी भेजें