-->
मॉयलच्या अन्यायाविरोधात उग्र आंदोलन; अधिवेशनात मुद्दा गाजणार.

मॉयलच्या अन्यायाविरोधात उग्र आंदोलन; अधिवेशनात मुद्दा गाजणार.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे सुरू असलेल्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज सहावा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. बाजार चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला आज विविध मान्यवरांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.

कार्यक्रमाला आ. राजू कारेमोरे, तुमसर माजी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, नगरपालिका उपाध्यक्ष सचिन बोपचे, तुमसरपं. स. माजी उपसभापती शिशुपाल गौपाले, बालापूर सरपंचा नेहा मेश्राम, चिखला सरपंचा करुणा कोकोडे, आष्टी उपसरपंचा प्रीती सोनवणे व सितासावंगी उपसरपंच नदीम पाशा यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. राजू कारेमोरे यांनी मॉयल कंपनीवर कडक शब्दांत टीका केली. 'कामगारांचे हक्क डावलले जात असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मॉयल प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर उग्र आंदोलन उभे करू आणि येत्या अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे उचलून सरकारला जाब विचारू,' असा इशारा त्यांनी दिला. उपोषणकर्ते प्रकाशकुमार कमलेशधिकोडी आपल्या मागण्यांवर ठामअसून ग्रामस्थांनीहीएकजुटीने आंदोलनाला पाठिंबा दिला. घोषणाबाजी करत

मॉयल कंपनी जर कामगारांचे हक्क पायदळी तुडवत असेल, तर आम्हीही शांत बसणार नाही. अन्याय करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून धडा शिकवला जाईल. कामगारांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू. येत्या अधिवेशनात हा मुद्दा इतक्या जोरात मांडू की सरकारलाच उत्तर द्यावे लागेल. कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.'
आ. राजू कारेमोरे.

प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आता मॉयल प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0 Response to "मॉयलच्या अन्यायाविरोधात उग्र आंदोलन; अधिवेशनात मुद्दा गाजणार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article