-->
स्व. मनोहरभाईंचे व्यक्तिमत्व असामान्य - डाॅ राहुल भगत

स्व. मनोहरभाईंचे व्यक्तिमत्व असामान्य - डाॅ राहुल भगत


दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"

तुमसर :- 'गोंदिया शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा पूर्व विदर्भातील जनसामान्यांचे नेते स्वर्गीय श्री मनोहरभाई पटेल म्हणजे असामान्य व्यक्तिमत्त्वाचे धनी होते' असे प्रतिपादन एस एन मोर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य राहुल भगत यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयात नुकताच स्वर्गीय श्री मनोहरभाई पटेल जयंती समारोह आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ जयंतकुमार मस्के, डॉ जगन्नाथ गडपायले व डॉ हितेश कल्याणी हे उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ राहुल भगत पुढे म्हणाले की, 'गुजरात मध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या मनोहरभाईंनी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात येऊन काळाच्या पटलावर आपली नाममुद्रा उमटवली. या परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीचे ते शिलेदार ठरले. १९५८ साली गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यामुळे सर्वांनीच मनोहर भाईंप्रती कृतज्ञ असायला हवे.'

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ रेणुकादास उबाळे म्हणाले की, 'ज्या काळामध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते, त्या काळात शिक्षणाच्या सर्वत्रिकीकरणाचे प्रयत्न मनोहर भाईंनी केले. पूर्व विदर्भाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील हरितक्रांतीचे जनक म्हणून त्यांची ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यामुळे स्वर्गीय श्री मनोहर भाई पटेल हे महनीय व्यक्ती ठरतात.'

याप्रसंगी डॉ जयंत कुमार मस्के म्हणाले की, 'मनोहरभाईंनी गोंदिया शहरासोबतच पूर्व विदर्भाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यामुळेच ते लोकप्रिय नेते ठरले.' डॉ जगन्नाथ गडपायले म्हणाले की, 'त्या काळात मनोहरभाईंची कीर्ती केवळ विदर्भापूर्तीच नव्हती. तर संपूर्ण महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता.' यावेळी डॉ हितेश कल्याणी यांनी स्व. श्री मनोहरभाई पटेल यांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकला.
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ रेणुकादास उबाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ सचिन वेरुळकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0 Response to "स्व. मनोहरभाईंचे व्यक्तिमत्व असामान्य - डाॅ राहुल भगत"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article