आमच्या गावाने जात सोडली !
बुधवार, 11 फ़रवरी 2026
Comment
.
जातमुक्त ठराव मंजूर करतानी ग्रामस्त
• सौंदाळ जात मुक्त गाव ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर..
• ग्रामसभेचा ठराव,ग्रामस्थांनी रक्तदान करत दिला एकात्मतेचा संदेश.
"सापताहीक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
भेंडा/अहिल्यानगर :- आम्ही गाव जातमुक्त करत आहोत. आमच्या गावात जातींवरुन भेद केला जाणार नाही. आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील.
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत, असा ठराव करत सौंदाळा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) गावाने 'जातमुक्त गाव' - अशी घोषणा केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव जातमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरावाबाबतची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी केली. त्यास बाबासाहेब
ग्रामसभेत मंजूर ठराव सौंदाळा गावामध्ये यापुढे आंतरजातीय विवाह केले जातील.
जात, पंथ, धर्म, वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
गावातील सर्व नागरिक समान असून, 'माझी जात-मानव' ही भावना स्वीकारण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातिभेद पूर्णपणे बंद राहील.
गावातील कुणीही सोशल मीडियावर जातिभेद करणारे मेसेज करणार नाही.
बोधक यांनी अनुमोदन दिले. सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. हे ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. या ठरावाच्या वेळेस ग्रामस्थांनी रक्तदान करून एकात्मतेचा संदेश दिला.
0 Response to "आमच्या गावाने जात सोडली !"
एक टिप्पणी भेजें