-->
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द स्वीकारल्यामुळे झाली समाजाची प्रगती सपना बन्सोड.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द स्वीकारल्यामुळे झाली समाजाची प्रगती सपना बन्सोड.


              कुलदीप गंधे 
  "साप्ताहिक" जनता की आवाज 
       
भंडारा :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयाला राजा मिलिंद यांचे नाव देण्याचे कारण महाविद्यालयातून विद्यार्थी जेव्हा समाजात एक व्यक्ती म्हणून येईल तेव्हा राजा मिलिंदा सारखा ज्ञानी होऊन प्रश्नाची उत्तरे विवेकाच्या कसोटीवर स्वीकारणारा असावा, कारण शिक्षण म्हणजे जो परिवर्तनाची भाषा बोलतो तो शिक्षण, म्हणून अधोगतीला गेलेल्या समाजाची आज फक्त आरक्षणाने नव्हे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बुध्द स्वीकारल्यामुळे प्रगती झाली, असे विचार समारोहाच्या मुख्य मार्गदर्शिका आयु. सपनाताई बन्सोड (शिक्षिका नवेगांवबांध) यांनी निमगांव येथे सिद्धार्थ महाबोधी महाविहार बुध्दमुर्तीचा 40 वा वर्धापनदिन व समता सैनिक दल शाखेचा 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. डॉ. जगनजी गडपायले सर ( एस एन मोर महाविद्यालय तुमसर) यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शरद चऊपगार सर (सि ए नागपूर) हे होते, समाजाला जेव्हढ्या मोठ्या बुद्धविहाराची गरज आहे तेव्हढीच त्या विहारामध्ये वाचनालयाची सुध्दा गरज आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना केले, विचारमंचावर मा. दिपक हिंगे (युवा व्याख्याता किन्ही), मा. नाशिक चवरे (कवी पिपरी भंडारा), मा. प्रदीप म्हैसकर (से.नि.जि गुणवत्ता नियंत्रक भंडारा), मा.प्रा अशोक शेंडे (पचखेडी नागपूर),मा.शिला राऊत ( सरपंच निमगाव), मा.तुळशीदास चवळे (उपसरपंच निमगाव ), मा.अंबादास चवळे ( पो. पा. निमगाव), मा.सुभाष चुधरी, मा.कुलदीप गंधे, मा. शशिकलाताई तिरपुडे, मा.मनोज बन्सोड, मा.संघपाल ऊके, मा.राजकुमार वाहने, मा.सिमाताई रामटेके(प.स.स.भंडारा), मा.धम्मपाल ऊके उपस्थितीत होते.
       आदल्या दिवशी 7 फेब. समर्पिता रमाई जयंती साजरी करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. करुणाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष सुसेन तिरपुडे तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रात्रीला बुद्ध-भिम गीतांचा प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रम मा. मनोजराजा गोसावी ( फुले शाऊ आंबेडकर चळवळीचे राष्ट्रीय प्रबोधनकार) व मा. अंजली घोळके ( महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायीका) यांनी सादर केला. कार्यक्रमाला समिती अध्यक्ष मा.कार्तिक तिरपुडे, मा.सुसेन तिरपुडे, मा. दिपक वानखेडे, मा. आदेश राऊत (बौद्धिक प्रमुख स. सै. दल जि. भंडारा) कमोज वानखडे, चंद्रशेखर राऊत, पद्माकर तिरपुडे, अतुल वानखेडे, सरोज राऊत, भरत राऊत, अमरदिप मेश्राम, मनोज गोंडाणे,रवी सुखदेवे, रोहित रामटेके, नितेश तिरपुडे, प्यारिलाल राऊत, जितेंद्र हुमणे, पंकज गोंडाणे, प्रविण राऊत, कोमल मेश्राम, जयपाल वैद्य, चेतना रामटेके, प्रिती राऊत, सिद्धान्त वानखेडे, आकाश रामटेके, सविता रंगारी, रिनाताई वासनिक, प्रिती वानखेडे, जयश्री तिरपुडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.राजकुमार राऊत (समिती सचिव) संचालन संकेत तिरपुडे यांनी केले तर आभार अभिषेक गोंडाणे यांनी मानले.

0 Response to "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द स्वीकारल्यामुळे झाली समाजाची प्रगती सपना बन्सोड. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article