यूनिवर्सल शैक्षणिक संस्था चा स्नेह सम्मेलन कार्यक्रम संपन्न.
सोमवार, 2 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की
नागपूर :- युनिवर्सल कॉन्व्हेन्ट चे चांदमारी नगर, पवन शक्ती नगर वाठोडा लेआउट नागपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य शुभम रमेश गणवीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शुभम मोटघरे, (नवनियुक्त नगरसेवक) विक्रम खुराणा (सामाजिक कार्यकर्ते), प्रा. वृषाली बोलधन, पार्थ गहाणे (प्रा. जिंगल बेल्स नागपूर), कैलास नागपुरे, प्रलय गणवीर, अविनाश खळोदे, मंगेश बांगडे,रंजीत राऊत,वकील शेख, उपस्थित होते आणि यूनिवर्सल कॉन्वेंट आणी ट्यूशन चे सर्व पालक वर्ग मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमच्या पहिल्या दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा, सामान्य ज्ञान, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, आनंद मेळावा, असे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी पारितोषिक वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि दरवर्षी प्रमाणे वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी 1) तनवीर विक्की लिल्लोर 228.5/240=95.28% 2) द्रितिका दीपक रंगारी 215/240=89.58% यांना पुष्पगुच्छ, पदक, ट्रॉफी, शालेय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शेवटी जेवणाचे आयोजन केले होते!
समा गणवीर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
व सहाय्यक शिक्षिका दीक्षा, हसीना, आंचल उपस्थित होते. नृत्य दिग्दर्शन खुशी मॅडम आणि कार्यक्रमाचे छायाचित्र व व्हिडीओ निखिल फोटोग्राफर पहेला, भंडारा यांनी केले. समा गणवीर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
0 Response to "यूनिवर्सल शैक्षणिक संस्था चा स्नेह सम्मेलन कार्यक्रम संपन्न."
एक टिप्पणी भेजें