-->
जिल्ह्यातील महिलांनी आदर्श होण्यासाठी सदैव तत्पर रहावे - डॉ. जयश्री सातोकर

जिल्ह्यातील महिलांनी आदर्श होण्यासाठी सदैव तत्पर रहावे - डॉ. जयश्री सातोकर



• भोजापुर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा यशस्वी.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- फातिमा शेख यांचा इतिहास अभ्यासतांना आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीमाईंचे कार्य अभ्यासावे लागते. फुले दाम्पत्यांना जेव्हा त्यांचे वडील गोविंदराव घराबाहेर काढतात व जागेच्या शोधात भटकट असतांना त्यांना उस्मानभाई शेख यांनी आपल्या ओसरीत आसरा दिला. त्यावेळी बहीण फातिमा शेख यांची ओळख झाली. नंतर हीच फातिमा सावित्रीबाईंच्या सोबतीने शिक्षण ग्रहण करते. नॉर्मल स्कूल मधून ट्रेनिंग घेतलेली पहिली शिक्षिका म्हणून अध्यापनाचे कार्य केले. सावित्रीबाईंची सखी- मैत्रीण म्हणून तिच्या सर्व सामाजिक आणि कौटुंबिक मदतीला धावून येणारी फातिमा ही खरोखरच समाजाच्या रोशाला भीक न घालता सावित्री- जोतिबा यांच्या कार्याला संपूर्णपणे आपले जीवन समर्पित करते. आज फातिमा शेख यांची ओळख आपल्याला होत असली, तरी त्या काळात मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागला होता. तरीही न डगमगता फातीमाने सावित्रीची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. स्वराज्य संकल्पित राजमाता माँ जिजाऊ यांना रयतेचे राज्य निर्माण करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करणारा शिवाजी घडविला. आणि बाळ शिवाजीचा छत्रपती राजे शिवाजी पर्यंतचा प्रवास स्वतःच्या मार्गदर्शनात घडवून आणला आहे. म्हणून जिल्ह्यातील महिलांनी आदर्श होण्यासाठी सदैव तत्पर रहावे असे प्रतिपादन डॉ. जयश्री सातोकर यांनी केले.
         त्या माता जिजाऊ व माता सावित्रीबाई व फातिमा शेख जयंती सोहळा अपूर्वा नगर भोजापूर (भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमाने माता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळयानिमित्त अपूर्वा नगर पटांगण भोजापूर येथे मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट सामाजिक कार्यकर्त्या शिला धुर्वे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शहारे, प्रगती महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. जयश्री सातोकर ( बनकर), सत्कारमूर्ती भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक पदक विजेती कु. प्राची केशव चटप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
       उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संकल्पित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, अल्पसंख्याक समाजातील पहिली मुस्लिम स्त्रीशिक्षिका फातिमा शेख, डॉ. बाबासाहेबांचे आधारवड रमाबाई आंबेडकर या महानायकांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
उपस्थित मान्यवरांचा अशोक राणा व स्वराज्य संकल्पिता राजमाता जिजाऊ' यांचे पुस्तक आणि गुलाब रोपट भेट देऊन सत्कार करण्यात आला. 
         त्यावेळी क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव लौकिक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व सुवर्णपदक विजेती कु. प्राची चटप हिचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गुलाबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अनुश्री वासनिक, उत्कर्ष लेंडे यांनी भाषण तर मीर भांडारकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच रूनल बोरकर हिने सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषा परिधान करून सर्वांचे मने जिंकली होती.
         प्रियाताई शहारे यांनी रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक घटकांचा प्रेरणादायी प्रवास मांडला. स्त्रीशक्ती वरील गायनाने महिलांना प्रबोधन केले.
          उपस्थित मान्यवरांनी माता जिजाऊ, माता सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्या कार्यावर प्रकाश टाकून विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले होते.
     त्यावेळी परिसरातील महिला मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली ढेंगे व प्रास्ताविक प्रा. निलम वाघमारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुकेशनी दुबे यांनी मानले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपाली कोटागंले, विणा खोब्रागडे, अभिलाषा हुमने, आम्रपाली रामटेके, श्यामला कोहपरे, मनिषा भांडारकर, माधुरी साठवणे, रोशनी निकुळे, शेवंता आकरे, शोभा निमजे, कुलश्री भजभुजे, रंजू जनबंधू, वंदना दंडारे, योगिता धांडे, वैशाली वाघमारे, प्रज्ञा घोरपडे, शालू ढेंगे, ज्योत्सना वासनिक, सलमा चौहान, रजिया पठाण, लक्ष्मी रामटेके, अमृत साखरवाडे, विश्वास साठवणे, सैंग कोहपरे, नरेश घोरपडे, रोशन भांडारकर, नामदेव धांडे तसेच माता जिजाऊ, माता सावित्रीबाई व फातिमा शेख जयंती सोहळा अपूर्वा नगर भोजापूर, भंडारा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

0 Response to "जिल्ह्यातील महिलांनी आदर्श होण्यासाठी सदैव तत्पर रहावे - डॉ. जयश्री सातोकर "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article