-->
नायगावात अनन्या दोनरु रेड्डी (भा.प्र.से.) यांचा जंगी सत्कार.

नायगावात अनन्या दोनरु रेड्डी (भा.प्र.से.) यांचा जंगी सत्कार.


गजानन पाटील चव्हाण मित्र परिवार व ग्रामवासीयांचा पुढाकार.

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 नांदेड/नायगाव बाजार :- अनन्या दोनरु रेड्डी (भा.प्र.से.), परीक्षाविधीन सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड तथा तहसीलदार नायगाव यांचा गजानन पाटील चव्हाण मित्र परिवार तसेच नायगाव तालुक्यातील ग्रामवासीयांच्या वतीने पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करत पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन रेड्डी यांचा गौरव करण्यात आला. नायगावसारख्या ग्रामीण भागात नायगाव येथे तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचा ध्यास घेतला आहे.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून रेड्डी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, युवक-युवतींनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याचा संकल्प करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य प्रशासनाने सातत्याने करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बालाजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते योगेश शेळगावे, ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक शिंदे (सुजलेगावकर), ह.भ.प. मा. श्री किशोर महाराज धर्माबादकर, गंगाधर बिलोलीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या उत्तरपर भाषणात अनन्या दोनरु रेड्डी यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, नायगाव तालुक्यातील विकासकामांना गती देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देणे हेच आपले प्रमुख ध्येय राहील. “प्रशासन हे लोकांसाठी आहे” या भावनेतून कार्य करताना सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

0 Response to "नायगावात अनन्या दोनरु रेड्डी (भा.प्र.से.) यांचा जंगी सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article