त्या अपघातातील अज्ञात मृतक व आरोपी सुद्धा गवसला!.
बुधवार, 25 फ़रवरी 2026
Comment
जेवणाळा येथील अपघात ,पालांदूर पोलिसांचे कौतुक.
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
पालांदूर :- अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. यातील अज्ञात वाहनधारक व मृतक व्यक्तीची ओळख पालांदूर पोलिसांच्या प्रयत्नाने ज्ञात झाली. महेश वसंत वासनिक (३५) राहणार राजेगाव एमआयडीसी भंडारा तर आरोपी अनिल मेश्राम राहणार गोंदी (देवरी) तालुका लाखनी असे आहे.
माहितीनुसार, मृतक महेश वसंत वासनिक(३५) हा सोमवारला दि. २३ फेब्रुवारीला दुचाकी क्रमांक एम एच ४० जी ५४, ने अर्जुनी/ मोरगाव येथे नातेवाईकाकडे गेला होता. परतीच्या प्रवासात पालांदूरच्या पुढे जेवणाळा येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरने आमोरासामोर धडक दिली. ट्रॅक्टरधारक घटनास्थळावरून पसार झाला होता व मृतकाची ओळख सुद्धा पटली नव्हती. मात्र पालांदूर पोलिसांनी कसब पणाला लावली. शोधाशोध घेत ट्रॅक्टर चालकाचा शोध लागला. ट्रॅक्टर चालकाने विटा खाली करून परत येत असताना वळणावर धडक दिली व घटनास्थळावरून पसार झाला.
मृतक नागपूर येथे कामाला....
मृतक हा नागपूर येथे कंपनीत काम करीत होता. तो नातेवाईकला भेटायला गावाकडे आला होता. यातच त्याचा अपघात झाला.
पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन...
पालांदूर पोलिसांनी घटनास्थळावरती महेश (पार्थिव) चे फोटो गावचे प्रमुख पोलीस पाटील, सरपंच, पोलीस ठाणे यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठविले. तेव्हा मंगळवारला सकाळी ९ वाजता महेशची ओळख त्या गावच्या सरपंचांनी कळविले. लाखनी येथे शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन केले.
ट्रॅक्टर चालक अनिल मेश्राम राहणार गोंदी/ देवरी याच्यावर पालांदूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास पोउपनि पेंदोर ठाणेदार सतीश बनसोड यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत. ट्रॅक्टर पालांदूर पोलिसांनी ठाण्यात जमा केला आहे.
0 Response to "त्या अपघातातील अज्ञात मृतक व आरोपी सुद्धा गवसला!."
एक टिप्पणी भेजें