-->
पत्रकार श्री डी. टी. आंबेगावे यांचा पन्हेळी-गायमुख गावाने केला विशेष सन्मान.

पत्रकार श्री डी. टी. आंबेगावे यांचा पन्हेळी-गायमुख गावाने केला विशेष सन्मान.

.           गौरव पत्र व पत्रकार डि.टि आंबेगावे

साप्ताहिक जनता आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

तळा/रायगड :- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून तळा तालुक्यातील पन्हेळी-गायमुख येथे सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा पार पडला. यावेळी 'प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ' महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा 'सत्य पोलीस टाइम्स'चे मुख्य संपादक श्री. डी. टी. आंबेगावे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

.        सम्मान करताना ग्रामस्थ कार्यकारी मंडळ

हा सोहळा गायमुख ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, बौद्धजन सेवा संघ आणि पंचशील महिला मंडळ (पन्हेळी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
श्री. डी. टी. आंबेगावे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे लढा दिला आहे. केवळ बातम्या देणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, पत्रकार, त्यांचे कुटुंबीय, गोरगरीब जनता, कष्टकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच ध्येयवादी कार्याची दखल पन्हेळीतील विविध मंडळांनी घेतली. सन्मानपत्रात म्हटले आहे की, " लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात आपण बजावलेली सेवा व आपले समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. सामाजिक प्रश्नांची जाण आपल्या निर्भीड वृत्तीमुळे समाजात अनेक महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. आपल्या ध्येयवादी कार्याची दखल घेऊन कृतज्ञतापूर्वकहे सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे." अशा भावना सन्मानपत्राद्वारे व्यक्त करण्यात आल्या. शिवजयंतीच्या पावन पर्वावर समाजातील एका लढवय्या पत्रकाराचा सन्मान झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश पाखड, व्याख्याते अनिस रायगडचे प्रधान सचिव श्री महेंद्र पाटेकर, डॉ भगवान लोखंडे, डॉ दत्ता कुंटेवाड, श्री प्रकाश गायकवाड, वाशी हवेलीचे मा सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, गायमुख ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सभासद, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सभासद, महिला मंडळाच्या अध्यक्षा, सचिवा व कार्यकारिणी सभासद, गायमुख बौद्धजन सेवा संघ ग्रामस्थ मंडळाची कार्यकारिणी व सभासद, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा सचिवा व कार्यकारिणी सभासद व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "पत्रकार श्री डी. टी. आंबेगावे यांचा पन्हेळी-गायमुख गावाने केला विशेष सन्मान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article