-->
नीट यूजी २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षा ३ मे रोजी

नीट यूजी २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षा ३ मे रोजी


"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क

नागपूर :- राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने राष्ट्रीय मेडिकल प्रवेश परीक्षा नीट (यूजी)-२०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. वैद्यकीय, दंतचिकित्सा तसेच आयुषशी संबंधित पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ८ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

करण्यात एनटीएकडून जारी आलेल्या सूचनेनुसार, नीट (यूजी) २०२६ परीक्षा देशभरात ३ मे २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारीपासून ८ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत

ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ८. मार्च २०२६ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत आहे. अर्ज केवळ https://neet.nta.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.

ही परीक्षा असमिया, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नीट (यूजी) च्या गुणांच्या आधारे देशभरातील वैद्यकीय एमबीबीएस, बीडीएस, बीव्हीएससी व एएच तसेच आयुषअंतर्गत बीएएमएस, बीयूएमएस, बीएसएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

0 Response to "नीट यूजी २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षा ३ मे रोजी"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article