-->
त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ अड्याळ येथे उत्साहात साजरी.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ अड्याळ येथे उत्साहात साजरी.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्याम तागडे सेवानिवृत्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा साखरे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शिवशंकर मुंगाटे, माझी वैद्यकीय अधिकारी गणेश मेश्राम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, माझी प्राचार्य अशोक वाहने ,पंचायत समिती सदस्या सीमा गिरी, ग्रामपंचायत सदस्य वसुश्री टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्या मडकवार ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व ,विश्वरत्न ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्याम तागडे माजी सेवानिवृत्त मुख्य सचिव, पत्रकार संजीव भांबोरे, सरपंच शिवशंकर मुंगाटे, पोर्णिमा साखरे, अशोक वाहने, यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली बुद्धविहाराचे अध्यक्ष मुनेश्वर बोदलकर यांनी केले तर आभार विकास टेंभुर्णे यांनी मानले. यावेळी बौद्ध उपासक ,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ अड्याळ येथे उत्साहात साजरी. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article