तुमसर शहरात सुरक्षेचे कवच; आमदार कारेमोरे व नगराध्यक्ष सागर गभने यांच्या हस्ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण.
शनिवार, 7 फ़रवरी 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तुमसर शहरात ४० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आमदार राजू कारेमोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नवनियुक्त नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांच्या कार्यतत्परतेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, नुकताच याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
१४ प्रमुख चौकांवर प्रशासनाची नजर
स्थानिक नागरी सेवा सुविधा योजनेअंतर्गत नगरपरिषदेने शहरातील अत्यंत वर्दळीच्या १४ मुख्य ठिकाणांची निवड केली आहे. यामध्ये राजाराम हॉल परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर (हसारा फाटा), मोठा बाजार, सिहोरा रोड, बस स्टॉप, रेल्वे टाऊन, शिवनी रोड, शिव मंदिर चौक, माळवीय नगर, लोटन पोहा चौक, पिपरा रोड, जैन मंदिर परिसर, बोरी रोड आणि पतंजली रोड या ठिकाणांचा समावेश आहे. या १४ केंद्रांवर एकूण ४० कॅमेरे बसवण्यात आले असून, त्यांचे मुख्य नियंत्रण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
गुन्हेगारीला बसणार वचक
नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच इंजि.सागर गभने यांनी शहराच्या विकासकामांचा धडाका लावला आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावताना त्यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील चोऱ्या, छेडछाडीच्या घटना आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांना तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला आमदार राजू कारेमोरे, नगराध्यक्ष इंजि.सागर गभने,सचिन बोपचे उपाध्यक्ष.न.प,
सतीश सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रदीप भरणेकर, राहुल रणदिवे, बापू बडवाईक, जमील शेख, भावेश पाल, दीपक लुटे, हर्षल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, नगरपरिषद कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांकडून स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही असावेत अशी मागणी नागरिक करत होते. आमदार व नगराध्यक्षांच्या या 'डिजिटल' पुढाकारामुळे तुमसरकर आता अधिक सुरक्षित अनुभवत असून सर्वच स्तरातून या कामाचे कौतुक होत आहे.
0 Response to "तुमसर शहरात सुरक्षेचे कवच; आमदार कारेमोरे व नगराध्यक्ष सागर गभने यांच्या हस्ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण."
एक टिप्पणी भेजें