-->
तुमसर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगूल.

तुमसर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगूल.


• प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर.

 "साप्ताहिक जनता की आवाज" 
  न्युज नेटवर्क.
 
तुमसर :- तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या रिंक्त जागा भरण्यासाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. निधन, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, तुमसर तालुक्यातील
 मुरली, बपेरा (आं.), सिहोरा, बपेरा (सि.) परसवाडा (सी.), देव्हाडी, हरदोली (सी.), रोंघा, खैरलांजी, गोंदेखारी, वाहणी, मिटेवानी, मांगली (दे.), सुकळी ( दे.)., माडगी. आणि गोबरवाही
 या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी थेट सरपंच पदाच्या जागा रिक्त असून, काही ठिकाणी सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जात वैधता

प्रमाणपत्र सादर न करणे, अपात्रता कारवाई आणि काही सदस्यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, १ जुलै २०२५ रोजी १ अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी या निवडणुकीसाठी आधारभूत मानली जाणार आहे. सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तहसीलदारांनी सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत की, विधानसभा यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदारांचा तपशील यात कोणतीही चूक होऊ नये. तसेच, नवीन नावे नोंदवणे किंवा दुरुस्ती करणे अशी कोणतीही कार्यवाही या स्तरावर केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

0 Response to "तुमसर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगूल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article