मौजा खापा येथे जल अर्पण क्रायक्रम...मुख्यमंत्री समूध्द पंचायतराज अभीयान व माझी वसुंधरा अभीयान ग्रामपंचायत रावनवाडी ६.०अंतर्गत.
रविवार, 15 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जल जीवन मिशन अंतर्गत दि.१४/२/२०२६ जल अर्पण दिवस ग्राम खापा येथे पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा व ग्रामपंचायत रावणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय सौ. कविताताई जगदीश ऊईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा, माननीय प्रशांतजी पडोळे खासदार भंडारा गोंदिया लोकसभा, माननीय आमदार नरेंद्रजी भोंडेकर भंडारा विधानसभा क्षेत्र, माननीय माणिकजी चव्हाण उपमुख्य कार्यपालन अधिकारी, माननीय हितेशजी खोब्रागडे कार्यकारी अभियंता, माननीय प्रमोदजी हुमणे गटविकास अधिकारी,सौ.सिमाताई रामटेके प.स.सदस्य ,सौ.ओमकांता पंधरे माजी सरपंच,श्री.सुर्यभान सीडाम माजी उपसरपंच,श्री जगदीश भाऊ उईके,सौ.पुजाताई प्रत्येकी,श्री.शेषराव पंधरे ग्रामपंचायत सदस्य श्री.एस.ए . लुटे ग्रामपंचायत अधिकारी,श्री.पराते सर .इतर सन्माननीय पाहुणे , गावातील मान्यवर, महिला व बाल गोपाल, शासकीय कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये पाहुण्याचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापा/जंगल येथील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केल. जल सपथ घेण्यात आली.खापा येथे सर्व घरी सर घर जल अंतर्गत पाणी पुरवठा केल्या जात आहे.नळ योजना सुरू राहण्यासाठी नागरिकांनी कर वेळेवर भरना करून नळयोजना सुरळीत राहण्यासाठी सहकार्य करावे.तसेच पाणी अडवा पाणी जिरवा,जल ही जीवन है.जल है तो कल है.या द्वारे पाण्याचे महत्त्व सांगण्यात आले.जल अर्पण क्रायक्रम घेण्याचा महाराष्ट्र मधुन प्रथम मान ग्रामपंचायत रावनवाडी/खापा ला मीळाला आहे. याबद्दल मान्यवर यांनी ग्रामवासी यांचे कौतुक केले. सदर क्रायक्रमा चे सुत्र संचालन श्री.महेश जगनीक सर यांनी केले.
0 Response to "मौजा खापा येथे जल अर्पण क्रायक्रम...मुख्यमंत्री समूध्द पंचायतराज अभीयान व माझी वसुंधरा अभीयान ग्रामपंचायत रावनवाडी ६.०अंतर्गत. "
एक टिप्पणी भेजें