दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभेच्छा कार्यक्रम
रविवार, 15 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय मिन्सी येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026, शुक्रवार ला वर्ग नववी कडून दहावीला निरोप व शुभेच्छा कार्यक्रम देण्यात आला यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गभने सर, प्रमुख पाहुणे सनराईज कंप्युटर चे संचालक श्री विलास बांडेबुचे सर, विद्यालयाचे वर्ग शिक्षक दिघोरे सर, मंगर सर, पुरामकर सर, कु परशुरामकर ,नखाते कहालकर अतकरी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत कथन केले तसेच वर्ग दहावी ला श्री विलास बांडेबुचे सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये खरे ध्येय आणि योग्य दिशा ठरविण्याची हि वेळ आहे असे सांगून हे जर ठरविले नाही तर विनाकारण तुमची ऊर्जा आणि शक्ती याचा क्षय होता. हे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना पटवून सांगितले व परीक्षेचे शुभेच्छा दिले. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून कडून विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज आणि भोले शंकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच सनराईज कंप्युटर चे संस्थापक श्री विलास बांडेबुचे यांचेकडून वर्ग दहावी सराव परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. मा.अध्यक्ष महोदय श्री गभने सर यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात पेपर कसा लिहायचा, पेपरला सामोरे जाताना घाबरू नका, हीमतीने पेपर द्या, अभ्यास करून जा अशा प्रकारचे मार्गदर्शन केले शेवटी स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभेच्छा कार्यक्रम "
एक टिप्पणी भेजें