-->
श्री सदगुर एकनाथ महाराज भजन मंडळ द्वारे श्री छ. शिवाजी महाराज जयंती साजरी.

श्री सदगुर एकनाथ महाराज भजन मंडळ द्वारे श्री छ. शिवाजी महाराज जयंती साजरी.


जितेंद्र गाडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

बुलढाणा :- स्थानिक सतिफैल परीसरातील धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक कार्यात नेहमी अग्रसेर असणारे श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळ देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या संकल्पनेतुन मागिल 26 वर्षा पासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने निस्वार्थ. अखंड पणे राबविण्यात येत आहे. त्यातील च एक उपक्रम म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिं १९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी

महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. सर्व प्रथम मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्याअर्पण करून श्रींच्या चरणाचे पुजन करून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय' अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे, अर्जुन राव जाधव, सुनिल ताकवाले, मोहन भोसले, मानु शर्मा व भजनी मंडळाचे सदस्य हजर होते.

0 Response to "श्री सदगुर एकनाथ महाराज भजन मंडळ द्वारे श्री छ. शिवाजी महाराज जयंती साजरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article