-->
शिक्षण विभागाचा अजब कारभार!..

शिक्षण विभागाचा अजब कारभार!..


• मुलांना शिक्षकाची भाषाच समजेना; शिक्षकांच्या बदलीसाठी पालकांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प. भंडारा यांना निवेदन.

• जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकना येथील प्रकार.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकना येथे विधार्थी १५,एक शिक्षक शिंदे , दिड
महिन्यापुर्वी रुजू झाले. मात्र ते लातूर कडील असल्यामुळे त्यांची विार्थ्यांत्यांना भाषा समजत नाही. त्यामुळे पालकांनी सदर शिक्षक बदलवून दुसरा शिक्षक देण्यात यावा अशी मागणी गटशिक्षणाधिकारी लाखांदूर मार्फत प्राथमिक शिक्षणाधिकारी भंडारा यांना दिनांक 2/2/2026 रोजी निवेदनातून करण्यात आली आहे.

 वर्ग 1ते 4 पर्यंत प्राथमिक शाळा आहे. भाषा समजत नसल्याने विार्थ्यांत्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्यांचे मुले या शाळेत शिकत नाही. अशांची मत हेच शिक्षक असावे असे आहे. त्यामुळे येथे राजकारण आड येत आहे. 
नेमकी अडचण काय? 

शाळेत अन्य विभागातून आलेले शिक्षक स्थानिक मराठी बोलीभाषा किंवा विधार्थांची संवाद शैली अवगत नाही. वर्गात शिक्षक जेव्हा विषयासंदर्भात बोलतात , तेव्हा विधार्थांना त्यांच्या उच्चारांनचा आणि शब्दांचा बोध होत नाही. यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कमी होत आहे. विधार्थी वर्गात प्रश्न विचारण्यास धजावत नाहीत. पाठांतराऐवजी मुले केवळ पुस्तकातील मजकूर उतरवून काढत आहेत. 
प्रशानाची भुमिका, या प्रकरणावर शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या भाषेबाबत निवेदन प्राप्त झाले असून हि तांत्रिक अडचण असून त्यावर मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बदलीसाठी 
प्रस्ताव पाठविला जाईल.

0 Response to "शिक्षण विभागाचा अजब कारभार!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article