-->
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ बस स्टॉप ची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ बस स्टॉप ची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात.

• महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तात्काळ लक्ष देईल का ?ग्रामस्थांचा एकच सवाल! प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील-पहेला येथील बस स्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात असून प्रवासी व विद्यार्थी यांना रस्त्यावर उभे राहून एस टी महामंडळाच्या बसची तास न तास वाट पाहावी लागते . प्रवासी व विद्यार्थी यांना उन्हाचा चटका बसतो 
या गावाचा परिसरातील 25 ते 30 गावाचा संपर्क येतो. परंतु सदर गावात बस स्टॉप नाही .यापेक्षा दुर्दैव कोणते ?सदर क्षेत्रातील बस स्टॉप ची जागा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या नावाने ५४.२० क्षेत्र चौरस मीटर असून ४२८ पहेला उपअधीक्षक भूमि अभिलेख भंडारा यांच्या कार्यालयात तशी नोंदणी आहे . महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी याबाबत त्वरित कारवाई करून सदर जागा मोकळी करून त्या ठिकाणी प्रवाशांकरता व विद्यार्थ्यांकरता बस स्टॉप तात्काळ बनविण्यात यावे अशी परिसरातील सर्व जनतेची मागणी आहे.

0 Response to "महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ बस स्टॉप ची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article