-->
कवीत रामजीची करणी सांगते.

कवीत रामजीची करणी सांगते.

.        लोककवी गौतम धोटे

(चाल - स्वतंत्र कोन सकाळी पूर्व ) 

आज जगीया सुमार्ग देण्या
दुःख असे साहिते 
रामजीचा जन धुरा वाहिते ॥धृ.।। 

अशी रामजीची करणी सांगते
लज्जीत होऊनी धरणी बोलते
व्याकुळल्या ना घास घालण्या 
जनजिवन फुलविते ॥१॥ रामजीचा... 

गरीबा घरी या जन्म घेवून 
बहुजनांचे दुःख पाहुनी 
वेळीच कोण येईल धावूनी 
आ जीवन झिजविते ॥२॥ रामजीचा... 

मानसाला माणूस बनविण्या
विषमतेच्या बेड्या तोडण्या
फुले कळ्यांना प्रकाश देण्या
'गौतम' हा सजवीते ॥३॥ रामजीचा 

लोककवि - गौतम धोटे आवारपूर 


0 Response to "कवीत रामजीची करणी सांगते."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article