जीवनात मोठे व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही -- मुखरू बागडे
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
• गोविंद विद्यालयाचा निरोप समारंभ
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- विद्यार्थी मित्रांनो परिश्रमाशिवाय अपेक्षित ध्येय गाठता येत नाही.दगडालासुध्दा घाव झेलल्याशिवाय देवत्व येत नाही.रात्र झाल्याशिवाय दिवस उजाडत नाही.तेव्हा मोठी होण्याचे स्वप्न बघत असाल तर अभ्यासाचा पाठलाग करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही ,असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून मुखरू बागडे यांनी पालादूर येथील गोविंद विद्यालयात वर्ग १० च्या विद्यार्थीना निरोप समारंभा प्रसंगी मार्गदर्शन केले.
येथील गोविंद विद्यालयात वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांनी वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःची आठवण राहावी म्हणून विद्यालयाला विशेष बक्षिसांची मेजवानी दिली. अत्यंत हृदयस्पर्शी निरोप समारंभाला दोन्ही वर्गातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष डॉक्टर अमित जवंजाळ, मुख्याध्यापक आनंदराव मदनकर, पर्यवेक्षिका प्रतिभा घाटबांधे, आदर्श शिक्षक पियुष वंजारी, राजहंस टेंभुर्णे मंचावर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक आनंदराव मदनकर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची आठवण ताजी करून दिली. शिस्त,कापीमुक्त अभियान, निर्भीडवृत्ती, दैनंदिन गृहपाठ, वक्तशीरपणा आदि विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉक्टर अमित जवंजाळ यांनी सुद्धा उज्वल भविष्याकरिता शिस्तप्रिय विद्यार्थी जीवन व मेहनत गरजेची असल्याचे बोलले. मंचावरील मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या वर्गमित्रांना जुन्या शैक्षणिक जीवनातल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या त्यागाची , प्रेमाची व शिस्तीची आठवण करून दिली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र आलिंगन देत भावपूर्ण निरोप घेतला. यावेळी क्षणभर वातावरण भावुक झाले. प्रास्ताविक विद्यार्थिनी प्रतिनिधी युगांती बडोले तर आभार तनुजा नंदरधने यांनी केले.
फोटो:
0 Response to "जीवनात मोठे व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही -- मुखरू बागडे "
एक टिप्पणी भेजें