कविता ( गित )कायदेमंञी घडविला(तर्ज : कुंकू लाविल)
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
रमा भीमाच्या जोडीला
उभी संकट घडीला../धृ//
गाडा संसाराचा माय तिन
मोठ्या जिद्दीन त्या रमान
गाडा समाजाचाओढीला.. //1//
देई पोटाला आई पिळ,
आई सांभाळी कोटी बाळ
घाम दगडाला फोडीला..//2//
होती कसोटीची ही वेळ
अंगी एकवटले ते बळ
मार्ग मध्यम काढीला.. //3//
केली गरिबीवर रमान मात
गौतम गुरगुरतो हा मणात
`भीम`कायदेमंत्री घडवीला.. //4//
कवी पञकार गौतम धोटे
आवारपूर 9637708593
0 Response to "कविता ( गित )कायदेमंञी घडविला(तर्ज : कुंकू लाविल) "
एक टिप्पणी भेजें