-->
धुलीवंदनाच्या पर्वावर विमान सेवेबाबत नांदेडकरां साठी आनंदाची बातमी !.

धुलीवंदनाच्या पर्वावर विमान सेवेबाबत नांदेडकरां साठी आनंदाची बातमी !.


         विजय चौडेकर
 "साप्ता."जनता की आवाज"
 
 नांदेड :- नांदेड येथून बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू होत असून, त्याचबरोबर नांदेड–नागपूर विमानसेवा देखील पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार Star Air कंपनीची गोवा (मोपा) – नांदेड – नागपूर ही विमानसेवा मार्च अखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. 

गोवा (मोपा) – नांदेड
सकाळी ९:३० वा. गोवा (मोपा) वरून उड्डाण
सकाळी १०:५० वा. नांदेड येथे आगमन

नांदेड – नागपूर
सकाळी ११:२० वा. नांदेडहून उड्डाण
दुपारी १२:१० वा. नागपूर येथे आगमन

नागपूर – नांदेड
दुपारी १२:४० वा. नागपूरहून उड्डाण
दुपारी १:३० वा. नांदेड येथे आगमन

नांदेड – गोवा (मोपा)
दुपारी २:०० वा. नांदेडहून उड्डाण
दुपारी ३:२० वा. गोवा (मोपा) येथे आगमन

याशिवाय Fly91 ही विमान कंपनी २९ मार्चपासून नांदेड–बंगळुरू विमानसेवा सुरू करणार आहे. त्यानंतर नांदेडहून बंगळुरूसाठी दोन विमानसेवा उपलब्ध होतील.

या तीनही सेवा सुरू झाल्यानंतर नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावरून मुंबई, पुणे, नागपूर, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, गोवा, बंगळुरू आणि हैद्राबाद या आठ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होईल...

0 Response to "धुलीवंदनाच्या पर्वावर विमान सेवेबाबत नांदेडकरां साठी आनंदाची बातमी !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article