श्री क्षेत्र रिद्धपुर मराठी विद्यापीठात शरदचंद्र बिडकर यांचा सत्कार..
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
साप्ता."जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- नुकताच मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, अमरावती.येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये सन्माननीय कुलगुरू डॉ. श्रीमान. अविनाशजी आवलगांवकर यांच्या हस्ते श्री. शरदचंद्रजी बिडकर श्री क्षेत्र रिद्धपुर यांचा( सर्वज्ञ साहित्य शिरोमणी, राष्ट्रीय पुरस्कारार्थ) भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कुलगुरू महोदयांनी रिद्धपूर वासियांन करीता अत्यंत अभिमानास्पद बाब होय, असे प्रतिपादन केले. व त्यांचे कार्याची प्रशंशा केली. यावेळी अनेक मान्यवर कवी डॉ.श्रीमान. भारतभुषण शास्त्री(प्रमुख, महानुभाव अध्यासन केंद्र नागपूर विद्यापीठ) श्रीमान. विष्णू भाऊ सोळंके, डॉ.शोभाताई रोकडे, प्रा.अण्णाजी वैद्य,प्रा.मोहनजी बाभुळगांवकर,यांची उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. श्रीमान सुबोध भांडारकर,आदरणीय श्रध्येय प.पूं.प.म.श्री. गोपीराज बाबा उर्फ महंत नागराज बाबा, पूं.ई. श्री. सुरेश दादा बापू राहेरकर, विद्यापीठ अधिष्ठाता श्रीमान डॉ.कोमल ठाकरे, प्राध्यापकश्री. राजेश बर्डे, डॉ.श्री. जयंत चौधरी, ई. श्री. भूषण दादा कवीश्वर, सामाजिक कार्यकर्ते श्री. रवींद्र बिडकर,ईत्यादींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जयंत चौधरी यांनी केले.मराठी भाषा गौरव दिनाला व सत्कार समारंभ कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "श्री क्षेत्र रिद्धपुर मराठी विद्यापीठात शरदचंद्र बिडकर यांचा सत्कार.."
एक टिप्पणी भेजें