-->
पवनी तालुक्यातील सावरला येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येथे संपन्न.

पवनी तालुक्यातील सावरला येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येथे संपन्न.




संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील सावरला येथे आज दिनांक 7 मार्च 2026 ला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले .या शिबिराला भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ, प्रशांत पडोळेराजेंद्रकुमार जाधव अप्पर जिल्हाधिकारी भंडारा, प्रशांत पडघण उपजिल्हाधिकारी रोहयो भंडारा ,सतीश साळवे तहसीलदार पवनी यांच्या उपस्थितीत एकूण 528 नागरिकांना विविध सातबारा , नमुना आठ अ , फेरफार, जातीचे, उत्पन्नाचे अधिवास प्रमाणपत्र ,संजय गांधी रोजगार ,शिधापत्रिका, सनद वाटप, आरोग्य तपासणी, आधार कार्ड दुरुस्ती ,ॲग्री ट्रॅक, पीएम किसान अर्ज स्वीकारणे ,लक्ष्मी मुक्ती , योजनेचा लाभ देण्यात आला. सदर कार्यक्रमाला नायब तहसीलदार सुनंदा धुर्वे , किशोर राऊत, प्रमोद राऊत नायबतहसीलदार सर्व ,मंडळ अधिकारी व सर्व ग्राम महसूल अधिकारी ,महसूल सेवक, सावरला ग्रामपंचायत अधिकारी ,सर्व कार्यालयीन कर्मचारी, अंगणवाडी ,सेविका विद्यार्थी उपस्थित होते. सदर शिबिरात 528 नागरिकांना सातबारा ,आठ अ ,फेरफार ,जातीचे उत्पन्न ,अधिवास प्रमाणपत्र ,संजय गांधी योजना शिधापत्रिका ,सनद वाटप ,आरोग्य तपासणी, आधार कार्ड दुरुस्ती, ॲग्री ट्रॅक, पीएम किसान अर्ज स्वीकारणे इत्यादी योजनेचा लाभ देण्यात आला.सदर शिबिरात ४०४ नागरिक उपस्थित होते. 18 लोकप्रतिनिधी ,मंडळातील सर्व सरपंच ,जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तक्रार करणाऱ्या नागरिकांची संख्या 18 होती.

0 Response to "पवनी तालुक्यातील सावरला येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येथे संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article