बोहलल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या!.
रविवार, 15 मार्च 2026
Comment
परसोडी (तई) येथील घटना, शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- चार दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते. लग्नाची धामधूम घरात सुरू असताना अचानक भावी नवरदेवाने गावाजवळच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारला(१२ मार्च) सकाळी ५:३० उघडकीस आली. राजेश अविनाश भेंडारकर(२५) राहणार परसोडी तालुका लाखांदूर असे त्याचे नाव आहे.
राजेश हा चंद्रपूर येथे दालमिया सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा लग्न १६ मार्चला नियोजित होता. लग्नानिमित्त तो आठ दिवसापूर्वी गावी आला होता. मात्र नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. हातावर मेहंदी लागण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पालांदूर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. पार्थिवावर उत्तरीयप्रक्रिया करून कुटुंबाच्या स्वाधीन केले. अंत्यसंस्कार आटोपले.
फोटो:
0 Response to "बोहलल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या!."
एक टिप्पणी भेजें