-->
अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना च्या वतीने सहाय्यक आयुक्त भंडारा यांना ईमेलद्वारे निवेदन.

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना च्या वतीने सहाय्यक आयुक्त भंडारा यांना ईमेलद्वारे निवेदन.



       

           
• डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी केली मागणी. 
  
• प्रस्तावित.अर्जाची अंतिम मुदत 15 मार्च 2026 रविवार असल्यामुळे अर्जदारास संभ्रम.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/तुमसर :- महाराष्ट्र शासनाच्या 'सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा' अंतर्गत आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, तसेच अपंग, गोरगरीब, गरजू व दीनदुबळ्यांना मदत करणाऱ्या समाजसेवकांसाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारा'ची घोषणा करून विविध वृत्तपत्रांमध्ये त्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शासनाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ (रविवार) निश्चित करण्यात आली होती. मात्र, अंतिम मुदतीचा दिवस हा सार्वजनिक सुट्टीचा (रविवार) असल्याने, 'कार्यालय बंद असेल व अर्ज सोमवारी स्वीकारले जातील' या समजुतीने अनेक इच्छुक आणि पात्र समाजसेवकांना वेळेवर आपले अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जमा करता आले नाहीत.

तरी आपणास नम्र विनंती आहे की, अनेक पात्र सामाजिक कार्यकर्त्यांची संधी हुकू नये याकरिता, अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करून ती मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त पात्र समाजसेवकांना या सन्मानासाठी अर्ज करण्याची योग्य संधी मिळेल.
असे नमूद केलेल्या ईमेल द्वारे विनंती पत्रकात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेश्राम व संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देश भ्रतार यांनी अंतिम मुद्दत वाढ विनंती पत्राद्वारे केली आहे.

1 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना च्या वतीने सहाय्यक आयुक्त भंडारा यांना ईमेलद्वारे निवेदन."

  1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार’ हा समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
    सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ही सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आपले प्रस्ताव सादर करता आले नाहीत. तसेच, काही कार्यकर्ते दुपारी तीन वाजल्यानंतर प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असता, कार्यालयीन प्रक्रिया बंद झाल्यामुळे त्यांचे प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत. परिणामी, अनेक पात्र व कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्त्यांची संधी हुकली आहे.
    म्हणून, अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा व त्यांची संधी वाया जाऊ नये यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार’ प्रस्ताव सादर करण्यासाठी किमान काही दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी
    सामाजिक न्याय विभागाने सदर बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
    धन्यवाद.
    ... डॉ. देवानंद बि. नंदागवळी

    जवाब देंहटाएं

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article